फोटो सौजन्य – X (Los Angeles Knight Riders)
Los Angeles Knight Riders vs Washington Freedom match report : मेजर क्रिकेट लिग सध्या सुरु आहे, यामध्ये अनेक दिग्गज आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील सामील झाले आहेत. आज या लीगचा 17 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात एलए नाइट राइडर्स विरुद्ध वाॅशिग्टंन फ्रिडम यांच्यामध्ये हा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात लॉस एंजेलिस नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी वॉशिंग्टन फ्रीडमच्या गोलंदाजांना धुडकावून लावले, परंतु तरीही संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात लॉस एंजेलिस नाईट रायडर्सचा फलंदाज आंद्रे फ्लेचरने शानदार फलंदाजी करताना शतक झळकावले. या सामन्यात दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
AUS vs WI : कांगारुचं मोडलं कंबरडं! 2 दिवसात 24 विकेट, दोन्ही संघाच्या गोलंदाजांचा सामन्यात कहर
लॉस एंजेलिस नाईट रायडर्स विरुद्ध वॉशिंग्टन फ्रीडम या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लॉस एंजेलिस नाईट रायडर्सने २० षटकांत ४ गडी गमावून २१३ धावा केल्या. लॉस एंजेलिस नाईट रायडर्सकडून फलंदाजी करताना आंद्रे फ्लेचरने ६० चेंडूंत १०४ धावांची खेळी केली, ज्यामध्ये ७ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर फ्लेचर रिटायर आउट झाला. याशिवाय उन्मुक्त चंदने ४१ आणि आंद्रे रसेलने १३ चेंडूंत ३० धावांची जलद खेळी केली.
WHAT A MATCH AND WHAT A WIN FOR THE WASHINGTON FREEDOM 🦅 pic.twitter.com/t0WNtFC7o4
— Cognizant Major League Cricket (@MLCricket) June 27, 2025
यानंतर, वॉशिंग्टन फ्रीडमच्या फलंदाजांनी लॉस एंजेलिस नाईट रायडर्सच्या गोलंदाजांना धुडकावून लावले. वॉशिंग्टन फ्रीडमने २० षटकांत ५ गडी गमावून हा सामना जिंकला. वॉशिंग्टनकडून फलंदाजी करताना मिचेल ओवेनने सर्वाधिक ४३ धावा केल्या, ज्यामध्ये ४ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. त्याच वेळी, कर्णधार ग्लेन मॅक्सवेलने पुन्हा एकदा शानदार फलंदाजीचा तमाशा सादर केला. या सामन्यात मॅक्सवेलने २३ चेंडूत ४२ धावा केल्या. या दरम्यान, त्याच्या बॅटमधून २ चौकार आणि ३ षटकार लागले.
मेजर लीग क्रिकेट २०२५ मध्ये लॉस एंजेलिस नाईट रायडर्सची कामगिरी आतापर्यंत खूपच खराब राहिली आहे. या हंगामात संघाने ६ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये लॉस एंजेलिस नाईट रायडर्सने फक्त १ सामना जिंकला आहे तर जेसन होल्डरच्या संघाला ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.