श्रेयस अय्यर स्वस्तात बाद (फोटो- सोशल मिडिया)
RCB Vs PBKS: आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलचा अंतिम सामना सुरू आहे. गुजरातच्या अहमदाबाद येथील मैदानावर हा सामना सुरू आहे. दरम्यान या सामन्यात पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर हा केवळ 1 धाव करून बाद झाला आहे. पंजाब किंग्जच्या अडचणीत वाढ झाली आहे. मागच्या सामन्यात विजयी खेळी करणार श्रेयस अय्यर स्वस्तात बाद झाला आहे.
रोयल चॅलेंजर्स बंगलोरकडून कृनाल पंड्याने 2 विकेट्स घेत पंजाबच्या धावगतीला ब्रेक दिला आहे. सध्या पंजाब किंग्जला 33 चेंडूत 74 धावा हव्या आहेत. पंजाब आणि बंगलोरमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
आरसीबीचा सलामीवीर फिल साल्टने आक्रमक सुरुवात केली होती. त्याने अर्शदीप सिंगच्या चेंडूवर षटकार मारून आपले खाते उघडले, पण त्याला जास्त वेळ तग धरता आला नाही. तो १६ धावांवर असताना त्याने काइल जेमिसनच्या चेंडूवर मोठा षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा डाव फसला आणि चेंडू हवेत खूप उंच गेला. चेंडू इतका उंच होता की तो आकाशात दिसतही नव्हता. पण तरीही, पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर मागे धावत जाऊन त्याने चेंडूवर नजर ठेवून झेल टिपला. अय्यरने हा झेल पकडण्यासाठी १४ पावले मागे घेतली आणि या दरम्यान त्याने १८ मीटर अंतर कापत हा झेल पूर्ण केला.
आरसीबी कशी खेळली
आरसीबीची सुरवात चांगली झाली नाही. ला संघाला दुसऱ्याच षटकात काइल जेमिसने झटका दिला. बसला आहे. पंजाबच्या काइल जेमिसनने फील सॉल्टला झेलबाद करून माघारी पाठवले. आरसीबीला दुसरा झटका बसला आहे. मयंक अग्रवाल १८ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. त्याला युजवेंद्र चहलने माघारी पाठवले. आरसीबीला धक्क्यावर धक्के बसत गेले. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. त्याला १६ चेंडूत २६ धावाच करता आल्या. त्याला काइल जेमिसनने पव्हेलियनमध्ये माघारी पाठवले.
विराट कोहली, फिल्ल साॅल्ट, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिविंस्टन, जितेश शर्मा, रोमरियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवुड, सुयश शर्मा
प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, जोस इंग्लिॉश, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टायनिस, अजमतुल्ला उमरजाई, विशक विजय कुमार, काइल जेमिसन, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह