आयूsh
Ayush Mhatre breaks Vaibhav Suryavanshi’s record: भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. तर दुसरीकडे भारतीय अंडर-१९ आणि इंग्लंड अंडर-१९ संघादरम्यान युवा कसोटी सामने खेळले जात आहे. या सामन्यात, भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेने मोठा पराक्रम केला आहे. आयुष म्हात्रेने त्याचा सहकारी असलेला फलंदाज वैभव सूर्यवंशीचा विक्रम मोडीत काढला आहे.
दुसऱ्या आणि शेवटच्या युवा कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये आयुषने १५० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने शतक ठोकले आहे. यासह त्याने आपला सहकारी वैभव सूर्यवंशीचा विक्रम मोडला आहे. १८ वर्षीय आयुषने केवळ ८० चेंडूत १३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने १२६ धावा फाटकावल्या आहेत. त्याने ६४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि ६८ व्या चेंडूवर षटकार मारून वैभवचा विक्रम खालसा केला.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या युवा कसोटी पदार्पणातील सामन्यात सूर्यवंशीने दुसऱ्या डावात ६२ चेंडूत १०४ धावा करून आपला प्रभाव पडला होता. डावखुरा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने १६७.७४ च्या स्ट्राईक रेटने धावा करून विश्वविक्रम केला होता, ज्यामध्ये १४ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. १९ वर्षांखालील युवा कसोटीत १५० किंवा त्याहून अधिक स्ट्राईक रेटने सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम आता आयुष म्हात्रेच्या नावे जमा झाला आहे.
इंग्लंड संघाने ३२४ धावांवर आपला डाव घोषित केला, ज्याच्या प्रत्युत्तरात विहान मल्होत्रा (१२०) आणि आयुष (८०) यांच्या दमदार कामगिरीमुळे भारताने २७९ धावा केल्या होत्या. इंग्लंडने दुसऱ्या डावात ३५५ धावांचे लक्ष्य ठेवले, परंतु भारताने शेवटच्या दिवशी ६ बाद २९० धावा करून सामना अनिर्णित ठेवण्य्त यश मिळवले. आयुषशिवाय दुसऱ्या डावात इतर कोणत्याही फलंदाजाला महत्त्वपूर्ण योगदान देण्यात यश आले नाही.
या कसोटी मालिकेत आयुषने शानदार कामगिरी करत ४ डावात ३४० धावा फटकावल्या आहेत. यादरम्यान त्याने २ शतके आणि एक अर्धशतक झळकावले. त्याशिवाय विहान मल्होत्राने २७७ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले आहे. गोलंदाजीत आदित्य रावत आणि आर. अंबरीश यांनी ६-६ बळी टिपले आहेत.
हेही वाचा : IND vs ENG : Joe Root ची गाडी काही थांबेना! मँचेस्टरमध्ये रचला इतिहास; ‘असे’ करणारा बनला जगातील पहिला फलंदाज