BAN vs NZ Match : बांगलादेश संघाकडून पाकिस्तानचा अपेक्षाभंग, न्यूझीलंडविरुद्ध फक्त 236 धावाच, PAK संघ स्पर्धेतून बाहेर होण्याची शक्यता
NZ vs BAN Match : चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्या सामन्यात बांगलादेश संघांने पाकिस्तानचा अपेक्षाभंग केल्याचा प्रकार पाहायला मिळाला. न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेशने अवघ्या 236 धावाच करू शकला. न्यूझीलंडच्या मानाने अगदी माफक लक्ष्य असल्यामुळे हे सहजरित्या पार होईल अशी अपेक्षा असल्याने आता बांगलादेश आणि पाकिस्तान जवळजवळ या स्पर्धेतून बाहेर पडेल असे वाटते. तथापि, बांगलादेश संघ पाकिस्तानच्या अपेक्षांनुसार खेळू शकला नाही. बांगलादेश प्रथम फलंदाजी करायला आला आणि ५० षटकांत फक्त २३६ धावाच करू शकला. बांगलादेशकडून कर्णधार नझमुल हुसेन शांतोने सर्वाधिक ७७ धावा केल्या, तर झाकीर अलीने ४५ धावांची खेळी केली.
बांगलादेशला न्यूझीलंड गोलंदाजांनी ठेवले जखडून
New Zealand are off to a good start in Napier!
Bangladesh have lost their openers and are reduced to 19/2 in five overs.#NZvBAN LIVE 👇https://t.co/HjcLR8TKB1 pic.twitter.com/1X89qcyVMN
— ICC (@ICC) February 13, 2019
पाकिस्तानमध्ये बांगलादेशच्या विजयासाठी प्रार्थना
जर न्यूझीलंडचा संघ आज जिंकला तर पाकिस्तान आणि बांगलादेश दोघेही २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडतील. याच कारणास्तव, आज पाकिस्तानमध्ये बांगलादेशच्या विजयासाठी प्रार्थना केली जात आहे. बांगलादेशचे फलंदाज किवी संघाविरुद्ध चमत्कार करू शकले नाहीत, पण आता त्यांचे गोलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणे बाकी आहे.
न्यूझीलंडचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सुरुवातीला दोन्ही सलामीवीर लयीत दिसत होते. बांगलादेशची पहिली विकेट ८.२ षटकांत ४५ धावांवर पडली. २४ चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांसह २४ धावा काढून तन्जीद हसन बाद झाला. तथापि, यानंतर नियमित अंतराने विकेट पडत राहिल्या.
तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मेहदी हसन मेराजने १३ धावा, तौहीद हृदयॉयने ०७, मुशफिकुर रहीमने ०२ आणि महमुदुल्लाहने ०४ धावा केल्या. तथापि, कर्णधार नझमुल हुसेन शांतो एका टोकावर ठाम राहिला. त्याने ११० चेंडूत ९ चौकारांसह ७७ धावांची खेळी केली. यष्टीरक्षक झाकीर अलीनेही त्याला चांगली साथ दिली. झाकीरने ५५ चेंडूत ४५ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून ३ चौकार आणि १ षटकार लागला. फिरकी अष्टपैलू रियाज हुसेनने जलद धावा काढण्याचा प्रयत्न केला. त्याने २५ चेंडूत दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २६ धावा केल्या. शेवटी, तस्किन अहमदनेही १० धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून फिरकी अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलने शानदार गोलंदाजी केली. त्याने १० षटकांत २६ धावा देत चार विकेट्स घेतल्या. याशिवाय, विल्यम ओरुकला दोन यश मिळाले.