फोटो सौजन्य - X
करुण नायर आणि जितेश शर्मा : टीम इंडीया आजपासुन इंग्लडविरुद्ध कसोटी मालिकेला सुरुवात करणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली त्याचबरोबर आर अश्विन यांनी घेतलेल्या कसोटी निवृतीनंतर भारतीय संघामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. यामध्ये अनेक नव्या खेळाडूंना भारतीय संघामध्ये स्थान मिळाले आहे. अर्शदीप हा भारतीय संघासाठी या मालिकेमध्ये पदार्पण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याने भारतासाठी एकदिवसीय क्रिकेट आणि टी20 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. नितीश कुमार रेड्डी, यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन यांना देखील टीम इंडीयामध्ये स्थान मिळाले आहे.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या करुण नायरची ८ वर्षांनी टीम इंडियामध्ये निवड झाली आहे आणि त्याची बॅटही इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करत आहे. करुणने इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स सामन्यात द्विशतक झळकावले होते. यापूर्वी, आयपीएल २०२५ मध्येही करुणची कामगिरी चांगली होती. आता करुण नायरने त्याचा देशांतर्गत क्रिकेट संघ विदर्भ सोडण्याचा निर्णय घेतला आहे, तर जितेश शर्मानेही विदर्भ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
ENG vs IND : पहिल्या सामन्यात तिसऱ्या नंबरचा प्रश्न सुटला! BCCI ने व्हिडीओ शेअर करुन दिली माहिती
गेल्या देशांतर्गत हंगामात करुण नायरने विदर्भासाठी खूप चांगली कामगिरी केली होती, त्याच्याशिवाय जितेश शर्मा देखील विदर्भाचा भाग होता. त्याच वेळी, क्रिकबझच्या एका अहवालानुसार या दोन्ही खेळाडूंनी नवीन देशांतर्गत हंगामापूर्वी विदर्भ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. करुण नायरने त्याच्या राज्य संघ कर्नाटकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे, तर जितेश शर्मालाही बडोद्यासाठी खेळायचे आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया १-२ दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Karun Nair and Jitesh Sharma have decided to leave Vidarbha. (Cricbuzz). pic.twitter.com/GSNFwJ6IiO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 19, 2025
जितेश शर्मासाठी आयपीएल २०२५ खूपच शानदार ठरला. आरसीबीने मेगा लिलावात जितेशला ११ कोटी रुपयांना विकत घेतले. सीझन-१८ मध्ये शानदार फलंदाजी करताना जितेशने १५ सामन्यांमध्ये २६१ धावा केल्या. यादरम्यान, त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही झळकावले. भारतीय संघामध्ये झालेल्या बदलांमुळे टीम इंडीयाला त्याचा फायदा होणार की फेल ठरणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. भारताच्या संघाची सुरुवात चांगली होइल अशी क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा आहे. त्यामुळे भारतीय संघामध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढेल.