हरमनप्रीत कौरने रचला नवा रेकॉर्ड (फोटो- ट्विटर)
हरमनप्रीत कौरने रचला विक्रम
हरमनप्रीत कौरने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत नवा विक्रम रचला आहे. हरमनप्रीत कौरने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपल्या 9000 रन्स पूर्ण केल्या आहेत. कालच्या सामन्यात 13 रन्स करताच हरमनप्रीत कौरने हा विक्रम रचला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यात 58 रन्सची शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच 9000 रन्स आपल्या नावावर करण्याचा विक्रम तिने आपल्या नावावर केला आहे.
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 9000 रन्स पूर्ण करणारी हरमनप्रीत कौर तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. भारताची माजी खेळाडू मिताली राजने 2022 मध्ये निवृत्ती घेतली होती. तिने आपल्या करकिरीदत 10 हजार पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत. तर दुसरी खेळाडू स्मृती मंधाना आहे. तिने 10,668 रन्स केल्या आहेत. तर हरमनप्रीत कौर आता तिसरी भारतीय खेळाडू ठरली आहे.
नजर लागली! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी महिला क्रिकेट संघाला मोठा धक्का; ‘ही’ खेळाडू बाहेर
कालच्या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना या दोघींनी शानदार भागीदारी रचली. काल तिने 58 रन्सची खेळी केली. दोघींनी 89 रन्सची भागीदारी केली. स्मृतीने 83 रन्सची शानदार खेळी केली. यामुळे भारताने पहिल्या डावात 285 रन्सचा डोंगर उभा केला आहे.
दे घुमाके! IND W Vs ENG W च्या सामन्यात हरमनप्रीत कौरचा डंका; 9000 रन्स अन् थेट ‘या’ क्लबमध्ये एंट्री
लॉर्ड्सवर Smriti Mandhana चा जागतिक रेकॉर्ड
स्मृती मंधानाचा हा 300 वा इंटरनॅशनल क्रिकेट सामना आहे. ती आपल्या कारकीर्दीतला 300 वा सामना खेळत आहे. सर्वात कमी वयामध्ये 300 इंटरनॅशनल क्रिकेट सामने खेळणारी ती सर्वात तरुण महिला खेळाडू बनली आहे. स्मृती मंधाना आज आपला 300 वा क्रिकेट सामना खेळत आहे. हा रेकॉर्ड रचताना तिने ऑस्ट्रेलियाची महान अष्टपैलू एलिस पेरी आणि क्षिण आफ्रिकेची सुने ल्युस या दोन दिग्गज खेळाडूंना देखील मागे टाकले आहे. सर्वात कमी वयात 300 इंटरनॅशनल क्रिकेट सामने खेळणारी स्मृती मंधाना ही जगतील 12 वी खेळाडू ठरली आहे. त्या आधी माजी खेळाडू मिटली राज आणि हरमनप्रीत कौरने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.






