फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Chennai Super Kings vs Rajasthan Royals toss update : आयपीएल २०२५ चा ११वा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये रंगणार आहे. या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्स नेतृत्व ऋतुराज गायकवाड करेल तर राजस्थान रॉयल्सचे कर्णधार पद रियान परागकडे असणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांचे आत्तापर्यंत दोन दोन सामने झाले आहेत. यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या संघाला दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे तर चेन्नई सुपर किंग्सने पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता तर दुसरा सामना त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध झाला होता या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध झाला होता या सामन्यातही त्यांना केकेआरने पराभूत केले होते. चेन्नई सुपर किंग्सचा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध झाला होता या सामन्यात त्यांनी मुंबईच्या संघाला पराभूत केले तर दुसरा सामन्यामध्ये त्यांचा सामना रॉयल चॅलेंजेस बंगळुरूच्या संघाविरुद्ध झाला होता या सामन्यात बंगळुरूच्या संघाने चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर १७ वर्षांनी दुसऱ्यांदा पराभूत केले.
🚨 Toss 🚨@ChennaiIPL won the toss and elected to bowl against @rajasthanroyals
Updates ▶️ https://t.co/V2QijpWpGO#TATAIPL | #RRvCSK pic.twitter.com/HFXVecPbCg
— IndianPremierLeague (@IPL) March 30, 2025
चेन्नई सुपर किंग्स संघाने दोन बदल केले आहेत यामध्ये दीपक हुद्दाच्या जागेवर विजय शंकरला घेण्यात आले आहे तर सांग त्यांच्या जागी जेमी ओव्हरटन संघामध्ये स्थान मिळाले आहे. राजस्थानच्या संघाने कोणताही बदल केला नाही. आज दोन्ही संघाच्या कामगिरीवर नजर असणार आहे, चेन्नई सुपर किंग्सला मागील सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे संघ पुन्हा ट्रॅकवर येऊन विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरेल. तर राजस्थानचा पहिला विजय मिळवण्यात यशस्वी होईल काही पाहणे मनोरंजक ठरेल
राहुल त्रिपाठी, रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रवींद्र जडेजा, विजय शंकर, जेमी ओव्हरटन, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, खलील अहमद, मथिशा पाथीराना.
संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, महेश तीक्ष्णा