फोटो सौजन्य - IndianPremierLeague
राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स टाॅस अपडेट : राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना सुरू झाला आहे. या सामन्यात एमएस धोनी आणि संजू सॅमसंग आमने-सामने असणार आहेत. या सामन्याचे नाणेफेक राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसंग याने जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ हे प्लेयर्स शर्यतीतून बाहेर झाले आहेत आज त्यांच्या सन्मानासाठी हा सामना दोघेही खेळणार आहेत. या सामन्यासाठी विशेषतः दोन्हींचे चाहते हे फार आनंदी आहेत आता फक्त शेवटचा सामना चेन्नईचा हा गुजरात टायटन्स विरुद्ध शिल्लक आहे.
या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केले आहे. दोन्ही संघ हे प्ले ऑफच्या शर्यतीतून फार आधीच बाहेर झाले आहेत. आज राजस्थान रॉयल्सचा हा शेवटचा सामना असणार आहे हा सामना दिल्लीतील अरुण जेटली मैदानावर खेळवला जात आहे. राजस्थान रॉयल्सच्या कामगिरीवर नजर टाकली तर संघाने आत्तापर्यंत 13 सामने खेळले आहेत यामध्ये फक्त त्यांना तीन सामन्यात विजय मिळवता आला आहे आणि दहा सामना त्यांचा पराभव झाला आहे.
🚨 Toss 🚨 @rajasthanroyals won the toss and elected to field against @ChennaiIPL
Updates ▶️ https://t.co/hKuQlLxjIZ #TATAIPL | #CSKvRR pic.twitter.com/TW5zGgi6SA
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2025
चेन्नई सुपर किंग्सच्या संघाबद्दल सांगायचे झाले तर संघाचे आतापर्यंत बारा सामने झाले आहेत यामध्ये त्यांना तीन सामन्यात विजय मिळाला आहे तर नऊ सामना त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. चेन्नईच्या संघामध्ये अनेक बदल करण्यात आले संघाचा आधीचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याला दुखापतेमुळे स्पर्धा सोडावी लागली त्याच्या जागेवर आयुष मात्रे याला संघामध्ये स्थान मिळाले आहे त्याचबरोबर अनेक युवा खेळाडूंना संघात जागा दिली केली आहे.
एम एस धोनी (कर्णधार), आयुष म्हात्रे, डेव्हॉन कॉन्वे, उर्विल पटेल, डेव्हॉल्ड ब्रेविस, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शिवम दुबे, नूर अहमद, खलील अहमद ,अंशुल कंबोज
यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, वानिंदू हसरंगा, क्वेना म्फाका, युधवीर सिंग, तुषार देशपांडे, आकाश मधवाल