फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
Who will be the captain of Delhi Capitals in IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा शुभारंभ ८ दिवसांमध्ये होणार आहे. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने अद्याप आयपीएल २०२५ साठी त्यांचा नवीन कर्णधार जाहीर केलेला नाही. आयपीएल २०२५ च्या लिलावानंतर आतापर्यंत सर्व ९ संघांनी त्यांच्या कर्णधारांची नावे जाहीर केली आहेत. पण दिल्लीने अद्याप आपला कर्णधार जाहीर केलेला नाही. दिल्ली कॅपिटल्सचा पहिला सामना २४ मार्च रोजी होणार आहे, हा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळवला जाणार आहे. तथापि, आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे, कारण दिल्लीने आपल्या नवीन कर्णधाराबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे आणि दिल्लीच्या नवीन कर्णधाराची घोषणा कधी आणि किती वाजता केली जाईल हे देखील सांगितले आहे.
१३ मार्च रोजी, दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या नवीन कर्णधाराबद्दल एक मोठी अपडेट दिली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी असे दाखवले आहे की CID मधील कलाकार DCP अभिजित हे दिल्ली कॅपिटल्सचा शोध घेताना दिसत आहेत. फ्रँचायझीने सांगितले की, नवीन कर्णधाराची घोषणा १४ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता केली जाईल. फ्रँचायझीने असेही सांगितले की नवीन कर्णधार निवडण्यात आला आहे. फक्त त्याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
Bohot ho gaye leaks, ab aur nahi 🔒🛑
Thank you, Captain Investigation Department 🥹🙏 pic.twitter.com/k2OAy9Y2IM
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 13, 2025
कर्णधारपदाच्या शर्यतीत फाफ डू प्लेसिस, केएल राहुल आणि अक्षर पटेल हे खेळाडू असल्याचे मानले जात आहे. राहुल आणि फाफ यांना कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे, तर अक्षर पटेल हा एक तरुण खेळाडू आहे. अशा परिस्थितीत, फ्रँचायझी त्याच्याकडे लांब शर्यतीचा घोडा म्हणून पाहू शकते. मात्र, आता कोणत्या खेळाडूला कर्णधारपद दिले जाईल हे पाहणे बाकी आहे. यासाठी चाहत्यांना थोडी वाट पहावी लागेल.
तारीख | संघ | ठिकाण |
---|---|---|
24 मार्च | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स | विशाखापट्टणम |
३० मार्च | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद | विशाखापट्टणम |
5 एप्रिल | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज | चेन्नई |
10 एप्रिल | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू | बंगळुरू |
13 एप्रिल | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स | दिल्ली |
16 एप्रिल | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स | दिल्ली |
19 एप्रिल | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स | अहमदाबाद |
22 एप्रिल | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स | लखनौ |
27 एप्रिल | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू | दिल्ली |
29 एप्रिल | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स | दिल्ली |
5 मे | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद | हैदराबाद |
8 मे | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज | धर्मशाळा |
11 मे | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स | दिल्ली |
15 मे | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स | मुंबई |