फोटो सौजन्य - सोशल मिडिया
दिल्ली प्रीमियर लीग २०२५ म्हणजेच डीपीएलच्या एलिमिनेटर सामन्यामध्ये, वेस्ट दिल्ली लायन्स विरुद्ध साउथ दिल्ली सुपरस्टार्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. संघाचा कर्णधार नितीश राणा आणि साउथ दिल्ली सुपरस्टार्सचा स्पिनर दिग्वेश राठी यांच्यात जोरदार टक्कर झाली. या दोघांमध्ये चालू सामन्यात कडाक्याचा वाद पाहायला मिळाला. अरुण जेटली स्टेडियमवर हा सामना सुरू होता, त्यादरम्यान दोन्ही स्टार्समध्ये बाचाबाची झाली. आता नितीश राठी यांनी दिग्वेशसोबतच्या भांडणावर मोठे विधान केले आहे.
खरंतर, लखनऊ सुपर जायंट्सचा फिरकीपटू दिग्वेश राठी आयपीएल २०२५ मध्ये खूप चर्चेत होता. दिग्वेश राठीने दिल्ली प्रिमियर लीगमध्ये चांगली कामगिरी केली, पण मैदानावर त्याच्या आक्रमक वृत्तीमुळे तो जास्त चर्चेत होता. ‘नोटबुक’ सेलिब्रेशन आणि विरोधी संघाच्या खेळाडूंशी भांडण केल्याबद्दल त्याचे मॅच फी तीनदा कापण्यात आली.
6,6,6,6,6…रिंकू सिंगचा जबरदस्त फॉर्म सुरूच! आता घाबरायचं नाय, भारत आशिया कपसाठी तयार
यासोबतच, त्याच्यावर एका सामन्याची बंदीही घालण्यात आली होती, पण दिग्वेश त्याच्या कृत्या थांबवत नाहीये. आता डीपीएलच्या एलिमिनेटर सामन्यात तो नितीश राणाशी भिडला. दिग्वेशने नितीशला चिडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर, पुढच्या चेंडूवर राणानेही असेच केले, परंतु त्याच षटकात राणाने एक लांब षटकार मारून प्रत्युत्तर दिले. यानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि राणा राठीकडे रातोशीने गेला. परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे पाहून खेळाडूंनी हस्तक्षेप केला.
या सामन्यात नितीश राणाने ५५ चेंडूत नाबाद १३४ धावा केल्या आणि त्यांच्या संघाला २०२ धावांचे लक्ष्य फक्त १७ चेंडू शिल्लक असताना ७ विकेटने साध्य केले. तथापि, या भांडणामुळे राठीला त्याच्या मॅच फीच्या ८०% आणि राणाला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल ५०% दंड ठोठावण्यात आला होता, परंतु आता राणा या भांडणाबद्दल उघडपणे बोलला आहे.
VIDEO | On his heated exchange with Digvesh Rathi during the Delhi Premier League match between South Delhi Superstarz and West Delhi Lions, cricketer Nitish Rana said:
“It would be very unfair from my side to share only my end of the story. We were both trying to win the match… pic.twitter.com/FP5CzOlgvf
— Press Trust of India (@PTI_News) August 30, 2025
माध्यमांशी बोलताना नितीश (दिग्वेश राठी वादावर नितीश राणा) म्हणाला, “मी कधीच भांडण सुरू करत नाही, पण जर कोणी मला धमकी दिली तर मी मागे हटणार नाही. जर कोणी मला फसवण्याचा प्रयत्न केला तर मी षटकार मारून उत्तर देईन.” तो असेही म्हणाला, “माझ्या पालकांनी मला शिकवले आहे की जर तुम्ही चुकीचे नसाल तर त्यासाठी उभे राहा.” आता नितीश राणाची टीम वेस्ट दिल्ली लायन्स ३१ ऑगस्ट रोजी डीपीएल २०२५ च्या फायनलमध्ये सेंट्रल दिल्ली किंग्जशी भिडणार आहे.