फोटो सौजन्य - X (Delhi Premier League T20)
दिल्ली प्रिमियर लीग 2025 सध्या सुरु आहे, या स्पर्धेचा २२ वा सामना आऊटर दिल्ली वॉरियर्स आणि साउथ दिल्ली सुपरस्टार्स यांच्यामध्ये खेळवण्यात आला होता. डीपीएल २०२५ चा २२ वा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता, कारण त्यांनी यापूर्वी प्रत्येकी एकच सामना जिंकला होता. तेजस्वी दहियाने वन मॅन आर्मी बनून ७० धावांची शानदार खेळी करत साउथ दिल्ली सुपरस्टार्सला विजय मिळवून दिला.
पावसामुळे काही काळ या सामन्यात व्यत्यय आले होते त्यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला होता. पावसामुळे, आउटर दिल्ली वॉरियर्स आणि साउथ दिल्ली सुपरस्टार्स यांच्यातील सामना उशिरा सुरू झाला. त्यांच्यात फक्त १६-१६ षटकांचा खेळ झाला. आउटर दिल्लीने प्रथम फलंदाजी करत ८ विकेट गमावून १३९ धावा केल्या. प्रियांश आर्य ९ धावांवर बाद झाला आणि कर्णधार हर्ष त्यागीनेही ३ धावांवर आपली विकेट गमावली. तथापि, सलामीवीर सनत सांगवानच्या २१ धावा, ध्रुव सिंगच्या ४२ धावा आणि शिवम शर्माच्या २१ धावांच्या जोरावर संघाने सन्मानजनक धावसंख्या गाठली.
Tejasvi Dahiya was named Player of the Match for his match-winning knock in the 22nd match of the Adani Delhi Premier League 2025! 🏏
Tejasvi Dahiya | Outer Delhi Warriors | South Delhi Superstarz | #AdaniDPL2025 #DPL2025 #DPL #Delhi #Cricket #T20 pic.twitter.com/3nRue6YMCc
— Delhi Premier League T20 (@DelhiPLT20) August 16, 2025
साउथ दिल्ली सुपरस्टार्सना १६ षटकांत विजयासाठी १४० धावांची आवश्यकता होती. कुंवर बिधुरी, रोहन राणा आणि कर्णधार आयुष बदोनी आणि मनीष सेहरावत यांना दुहेरी आकडाही ओलांडता आला नाही. अनमोल शर्माच्या २३ आणि सुमित बेनिवालच्या १९ धावांच्या छोट्या खेळीमुळे संघ बचावला. तेजस्वी दहिया खेळपट्टीवर राहिला आणि त्याने आपली विकेट गमावली नाही. शेवटच्या दोन षटकांत विजयासाठी संघाला ३४ धावांची आवश्यकता होती.
6,6,6,4,4… Asia Cup 2025 आधी संजू सॅमसनने केला हाहाकार! आता सिलेक्टर कसे करणार दुर्लक्ष
१९ व्या षटकात, दहियाने शौर्य मलिकला तीन षटकार मारले आणि २१ धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण दिल्लीला विजयासाठी 13 धावांची गरज होती. शेवटच्या दोन बाॅलमध्ये ७ धावांची गरज असताना यावेळी तेजस्वीने संघाच्या विजयासाठी एक षटकार आणि नंतर एक चौकार मारला. त्यांनी सामना ३ विकेट्सने जिंकला. तेजस्वीने ६ षटकार आणि ४ चौकारांसह नाबाद ७० धावा केल्या.
साउथ दिल्ली वॉरियर्सने डीपीएल २०२५ मध्ये आपला दुसरा विजय नोंदवला. ते सातव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. या विजयासह साउथ दिल्लीला दोन महत्त्वाचे गुण मिळाले आहेत. या विजयामुळे संघाला खूप आत्मविश्वास मिळेल, कारण याआधी ते संघर्ष करत होते.