फोटो सौजन्य - X
PSL 2025 : भारतामध्ये सुरु असलेल्या पाकिस्तानविरुद्ध युद्धामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण सुरु आहे. त्यामुळे भारतात कालचा सामना रोखण्यात आला आणि त्यानंतर बीसीसीआयने स्पर्धा काही काळासाठी रद्द करण्यात आली आहे. तर शेजारी देशामध्ये सुद्धा पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच पीएएल सुरु होते. तणावाच्या वातावरणामुळे पाकिस्तान सुपर लीग दुबईमध्ये खेळले जाणार असे म्हंटले जात होते पण आता युएईने पाकिस्तान सुपर लीगचे आयोजन करण्यासाठी नाकारले आहे.
पाकिस्तान क्रिकेट लीग २०२५ सध्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएल पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मग असे सांगण्यात आले की ही स्पर्धा दुबईला हलवली जाईल. पण आता पाकिस्तानला लाज वाटली आहे. न्यूज २४ च्या सूत्रांनुसार, दुबईने पाकिस्तान सुपर लीग २०२५ चे आयोजन करण्यास नकार दिला आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे पाकिस्तान सुपर लीग २०२५ सध्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. पण आता सूत्रांनी न्यूज २४ ला सांगितले आहे की पाकिस्तान सुपर लीग २०२५ सध्या दुबईमध्ये आयोजित केली जाणार नाही. दुबईने पाकिस्तान सुपर लीग २०२५ चे उर्वरित सामने पुढे ढकलले आहेत.
🚨 UAE DECLINES TO HOST PSL. 🚨
– The UAE likely to shut the door due to India & Pakistan conflict. (ANI). pic.twitter.com/JgURxDDtPI
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 9, 2025
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ८ मे रोजी रावळपिंडीमध्ये ड्रोन स्फोट झाला होता, ज्यामुळे रावळपिंडी स्टेडियमला लागून असलेल्या एका इमारतीचेही नुकसान झाले होते. पाकिस्तान सुपर लीग २०२५ चा सामना क्रमांक २७ हा पेशावर झल्मी आणि कराची किंग्ज यांच्यात खेळला जाणार होता. पण कालच हा सामना रद्द करण्यात आला. पीएसएल २०२५ मध्ये आतापर्यंत २६ सामने खेळले गेले आहेत. अंतिम सामने १८ मे रोजी खेळवले जाणार होते. पण आता पाकिस्तान सुपर लीग कधी आणि कुठे खेळवली जाईल. सध्या याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
भारत-पाकिस्तान तणावामुळे आयपीएल २०२५ वरही परिणाम झाला आहे. ही स्पर्धा एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ८ मे रोजी पंजाब किंग्ज आणि दिल्ली यांच्यात खेळलेला सामना रद्द करण्यात आला. सामन्यादरम्यानच धर्मशाळेत ब्लॅकआउट झाला. त्यानंतर दोन्ही संघामधील सर्व खेळाडूंना ट्रेनमधून त्यांना मुंबईच्या दिशेने पोहोचले आहे. आता आयपीएल बीसीसीआय कधी सुरु करणार यासंदर्भात अपडेट दिली आहे पण त्यावर अजून कॉन्फर्मेशन आले नाही.