फोटो सौजन्य – ICC
टिम साउथी : टीम इंडियाची लढत ही बेन स्टोक्सच्या संघाविरुद्ध सुरू आहे. मागील 18 वर्षे भारतीय संघावर धबधबा दाखवणारा बेन स्टोक्स काल फिका पडला. काल इंग्लिश गोलंदाज फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. याचे नुकसान त्यांना नक्कीच मोहब्बत पडणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या संघाने त्यांचा दबदबा दाखवायला सुरुवात केली आहे. भारतीय युवा संघ कालपासून इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी करताना दिसत आहे ती मीडियाच्या दोन खेळाडूंनी एकाच दिवशी शतक झळकावले.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने पहिल्या दिनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचा सुरुवातीचा निर्णय म्हणजेच नाणेफेकीचा निर्णय हा इंग्लंडच्या बाजूने वळला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे भारताच्या संघासमोर फलंदाजीचा उभे राहिले. नाणेफेकीच्या नंतर इंग्लडला हा निर्णय चांगलाच महागात पडला आहे असे दिसुन येत आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाजी सल्लागार टिम साउथी यांनी कर्णधार बेन स्टोक्सच्या हेडिंग्लेच्या कोरड्या खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.
सुरुवातीच्या सत्रात खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल असेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली, परंतु भारताच्या तरुण आणि प्रतिभावान फलंदाजांनी त्यांच्या शानदार कामगिरीने त्यांना निराश केले. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय चुकीचा ठरला कारण कर्णधार शुभमन गिल नाबाद १२७ केल्या आहेत आणि यशस्वी जयस्वाल १०१ धावा करुन यांनी कोरड्या खेळपट्टीवर शतके ठोकली, ज्यामुळे भारताला शुक्रवारी पहिल्या दिवशी तीन बाद ३५९ धावा करता आल्या.
इंग्लंडचा कर्णधार स्टोक्सच्या निर्णयावर माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी जोरदार टीका केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत साउथी म्हणाले, “कालच्या खेळपट्टीचा रंग आणि त्यात काही ओलावा पाहता, जर त्याने थोडीशी मदत केली असती तर कदाचित त्याचा परिणाम आज सकाळी दिसून आला असता. या निर्णयावर आधारित हा निर्णय घेण्यात आला.”
तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही खेळपट्टीचे मूल्यांकन करता तेव्हा तुम्ही त्यावर आधारित निर्णय घेता. प्रत्येक वेळी तुमचा निर्णय बरोबर असेलच असे नाही.” तथापि, न्यूझीलंडच्या माजी वेगवान गोलंदाजाने परिस्थितीशी जुळवून घेतल्याबद्दल आणि इंग्लंडचा निर्णय चुकीचा सिद्ध केल्याबद्दल भारतीय फलंदाजांना पूर्ण श्रेय दिले.