फोटो सौजन्य : MPLT20Tournament
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 सुरू आहे यामध्ये सहा संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये रायगड विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स यांच्यामध्ये सामना पार पडला या सामन्यात रायगड रॉयलच्या संघाने सहा विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह आता रायगड राॅयल्सचा संघ हा एलिमिनेटर सामना खेळणार आहे. क्रिकेट खेळताना एकतर आपला चांगला फॉर्म लागतो त्याचबरोबर आपला एक चांगला नशीब लागतं बाद न होण्यासाठी. या सामना दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला आहे.
सामन्याबद्दल सांगायचे झाले तर कोल्हापुर तस्कर्सच्या संघाने पहिले फलंदाजी करत ७ विकेट्स गमावुन 164 धावा केल्या होत्या यामध्ये रायगड राॅयल्सच्या संघाने हे लक्ष 19.4 ओव्हरमध्ये पुर्ण केले आणि एलिमिनेटर सामन्यामध्ये स्थान पक्के केले आहे. आता सोशल मिडीयावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे यासंदर्भात सविस्तर जाणुन घ्या.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राजस्थान राॅयल्सचे दोन फलंदाज हे फलंदाजी करत असतात आणि चेंडु क्रिजवर असलेला फलंदाज मारतो आणि त्यानंतर दोन्ही फलंदाज हे धावा घेण्यासाठी पळतात. पहिली धाव दोन्ही फलंदाज पुर्ण करतात आणि जेव्हा दुसरी धाव घ्यायची असते तेव्हा दोघे एकमेकांना न बघता पळत असतात कारण दोघांचे लक्ष हे चेंडुकडे लागलेले असते. दुसरी धाव घेताना हे दोघे एकमेकांना आदळतात आणि त्यानंतर फिल्डर चेंडू पकडण्यासाठी पळतो.
दोन्ही फलंदाज हे मैदानावर कोसळतात आणि त्यानंतर फिल्डर चेंडु विकेटकिपरकडे टाकतो. पण विकेटकिपर तो चेंडु दुसऱ्या टोकाला टोकतो. जो खेळाडु दुसऱ्या टोकाला असतो तो खेळाडु स्टंम्पला हात लावतो पण त्यावेळी त्याच्या हातामध्ये चेंडु नसतो. राहुल त्रिपाठी चेंडु घेऊन दुसऱ्या टोकाला पळतो आणि मैदानावर कोसळलेला खेळाडु उठतो आणि तो पळतो राहुल त्रिपाठी ओव्हर थ्रो करतो आणि रायगडच्या संघाला ६ धावा मिळतात.
Collided, but never gave up — still made the crease! ✅
Vicky Ostwal. TAKE A BOW 👏#AdaniMPL2025 #RRvsPBGKT #ThisIsMahaCricket pic.twitter.com/LXsssa740e
— MPLT20Tournament (@mpltournament) June 20, 2025
पाॅइंट टेबलबद्दल सांगायचे झाले तर इगल नाशिक टायटन्स हा संघ पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर पुणेरी बाप्पा हा संघ आहे. तिसऱ्या स्थानावर रायगड राॅयल्सचा संघ आहे.