फोटो सौजन्य – X
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये सामना सुरु आहे, काल या सामन्याता तिसरा दिवस पार पडला. या सामन्यात भारताच्या संघाने इंग्लडला 465 धावांवर पहिल्या डावामध्ये रोखले आहे. सध्या भारताचा संघ तिसऱ्या डावामध्ये फलंदाजी करत आहे. यामध्ये टीम इंडीयाने 2 विकेट्स गमावले आहेत. पहिल्या डावामध्ये भारताचा उपकर्णधार ऋषभ पंत याने कमालीचा खेळ दाखवला होता. त्याने भारतीय संघासाठी शतक झळकावले आणि भारताच्या संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळाले आहे. सध्या ऋषभ पंतचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे यामध्ये तो पंचांवर संतापलेला पाहायला मिळाला.
भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्समध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत त्याच्या वागण्यामुळे चर्चेत होता. पंत चेंडू बदलू इच्छित होता, पण जेव्हा ते घडले नाही तेव्हा तो पंचांशी भांडला. भारतीय संघाच्या उपकर्णधाराने बराच वेळ पंचांशी वाद घातला, त्यानंतर पंत रागावला आणि त्याने पंचांसमोर चेंडू जमिनीवर फेकला. पंतच्या या वागण्यामुळे त्याच्यासाठी समस्या निर्माण होऊ शकतात. आयसीसीच्या दोन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल विकेटकीपर फलंदाजाला कठोर शिक्षा होऊ शकते.
मैदानावर पंचांशी भांडण झाल्यामुळे ऋषभ पंतला दोन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा होऊ शकते. आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.८ च्या लेव्हल १ अंतर्गत, पंतला पंचांच्या निर्णयाचा निषेध केल्याबद्दल दोषी ठरवले जाऊ शकते. यासोबतच, कलम (अ) आणि कलम (ह) अंतर्गत पंचांच्या निर्णयावर दीर्घ चर्चा केल्याबद्दलही तो दोषी ठरवला जाऊ शकतो. भारतीय उपकर्णधाराला आचारसंहितेच्या कलम २.९ चे उल्लंघन केल्याबद्दलही दोषी ठरवले जाऊ शकते. पंतने रागाच्या भरात पंचांकडे चेंडू फेकला, ज्यासाठी त्याला कठोर शिक्षा होऊ शकते.
Rishabh Pant asked the umpire to change the ball, got denied and then threw it in frustration 😭😭😭 https://t.co/F1A78XGwWV — Sandy (@flamboypant) June 22, 2025
इंग्लंडच्या डावातील ६१ व्या षटकात, हॅरी ब्रूकने मोहम्मद सिराजच्या चेंडूवर एक जबरदस्त चौकार मारला. त्यानंतर, कर्णधार शुभमन गिल आणि उपकर्णधार पंत यांनी पंचांकडे जाऊन चेंडू बदलण्याची विनंती केली. पंचांनी चेंडू तपासला आणि सांगितले की तो अजूनही खेळण्यायोग्य आहे. त्यानंतर, पंत खूप संतापला आणि पंचांशी वाद घालू लागला. त्याचा मुद्दा मान्य न झाल्यामुळे, पंत संतापला आणि त्याने पंचांसमोर चेंडू जमिनीवर फेकला आणि काहीतरी बोलत मागे वळला. पंतचे हे वर्तन पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनीही गोंधळ घातला.






