फोटो सौजन्य : X
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये 20 जून पासून कसोटी संघाला सुरुवात होणार आहे भारताचा संघ इंग्लंड विरुद्ध पाच सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. रोहितच्या निवृतीनंतर शुभमन गिल भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मालिका सुरू व्हायला फक्त आता आठ दिवस शिल्लक राहिले आहेत भारताचा संघ इंग्लंडमध्ये कसून सराव करत आहे. आता भारतीय संघाचे बॉलिंग कोच मॉर्न मॉर्केल याने प्लेइंग इलेव्हनमध्ये नितेश कुमार रेड्डी की शार्दुल ठाकूर या दोघांमधील कोणाला संधी मिळणार यासंदर्भात जेव्हा विचारण्यात आले तेव्हा त्याने कोणतेही उत्तर देण्यास नकार दिला.
त्याने सांगितले की जोपर्यंत संघाचे संतुलन चांगले आहे तोपर्यंत मी खुश आहे गोलंदाजी मध्ये तुम्हाला जे टेस्ट क्रिकेटला गरज आहे ते करण्यात मला गरजेचे आहे. मॉर्केल पुढे म्हणाला की, फलंदाजी करणारा अष्टपैलू नितीशने अधिक षटके टाकावीत अशी त्याची इच्छा आहे कारण तो मध्यभागी जादू टाकण्यास सक्षम आहे. “मला वाटते की तो एक कुशल खेळाडू आहे. तो असा खेळाडू आहे जो जादू टाकू शकतो,” असे सराव सत्रादरम्यान मॉर्केल म्हणाला.
कोच त्याचे मत मांडताना म्हणाले की, त्याच्यासाठी सातत्याने चांगली कामगिरी करणे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि आम्हाला त्यावर काम करायचे आहे. हे त्याच्या खेळासाठी देखील महत्त्वाचे आहे. तो म्हणाला की मी त्याच्याशी चर्चा केली ज्यामध्ये मी त्याला थोडे अधिक गोलंदाजी करण्याचे आव्हान दिले. दोघांनीही सामन्यामध्ये त्याचबरोबर सरावामध्ये अधिक षटके गोलंदाजी करावी अशी माझी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
मॉर्केल म्हणाला, ‘आम्ही इंग्लंडचा सामना कसा करायचा याबद्दल खूप चर्चा केली आहे. पण मला वाटते की आतापर्यंत आम्ही तयारीच्या बाबतीत योग्य दिशेने वाटचाल करत आहोत. सामन्याच्या दिवशी आमच्या खेळाडूंनी त्यांची रणनीती चांगल्या प्रकारे राबवणे महत्त्वाचे असेल.’
भारतीय संघाने संघ निवडीच्या बाबतीत सर्व पैलूंचा विचार केला आहे असा मोर्केलला विश्वास आहे. तो म्हणाला, “मला वाटते की आम्ही सर्व पैलूंचा विचार केला आहे. पण आता आमच्यासाठी मुख्य गोष्ट म्हणजे तंदुरुस्त असणे, तयार असणे आणि कसोटी सामन्यासाठी पूर्ण उत्साहाने खेळणे. आम्ही मागील अनेक काही महिन्यांपासून कसोटी सामने खेळलेले नाही.”