फोटो सौजन्य: Pinterest
टोयोटा इनोव्हाने भारतातील एमपीव्ही सेगमेंटला एक नवीन ओळख दिली. गेल्या 20 वर्षांपासून, इनोव्हा आणि इनोव्हा क्रिस्टा या सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय वाहनांमध्ये गणल्या जातात. मात्र, आता असे वृत्त आहे की टोयोटा मार्च 2027 पर्यंत भारतीय बाजारातून इनोव्हा क्रिस्टा बंद करू शकते. ऑटो इंडस्ट्रीच्या अहवालांनुसार, हा निर्णय कंपनीच्या नवीन धोरणामुळे आणि येणाऱ्या नियमांमुळे असू शकतो. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Hero Splendor की TVS Star City Plus, तुमच्यासाठी कोणती बाईक खरेदी करणे असेल बेस्ट डील? जाणून घ्या
मजबूत, आरामदायी आणि उत्कृष्ट प्रीमियम एमपीव्ही शोधणाऱ्यांसाठी इनोव्हा क्रिस्टा ही एक उत्तम ऑप्शन आहे. असे असूनही, ही कार बंद करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आगामी कडक CAFE 3 नियम. हे नियम कार कंपन्यांना त्यांच्या संपूर्ण वाहनांचा सरासरी इंधन वापर आणि कार्बन उत्सर्जन राखण्यास भाग पाडतात.
Toyota ने आधीच स्पष्ट केले आहे की भविष्यात कंपनी पेट्रोल हायब्रिड टेक्नॉलॉजीवर अधिक भर देणार आहे. Innova Hycross हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. CAFE नियमांनुसार एक स्ट्रॉंग हायब्रिड वाहन दोन गाड्यांच्या समतुल्य मानले जाते, त्यामुळे कंपनीला आपले टार्गेट पूर्ण करणे अधिक सोपे जाते. याच कारणामुळे हायब्रिड मॉडेल्स Toyota साठी अधिक फायदेशीर ठरतात.
याच्या उलट, Innova Crysta सारखी डिझेल MPV कंपनीची सरासरी इंधन खपत वाढवते, त्यामुळे नियमांचे पालन करणे कठीण होते. म्हणूनच Toyota हळूहळू Crysta बंद करण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे.
Innova Hycross लाँच झाल्यानंतर Toyota ने काही काळासाठी Crysta बंद केली होती. मात्र, सेमीकंडक्टरची कमतरता आणि Hycross साठी लागलेला जास्त वेटिंग पीरियड यामुळे Crysta पुन्हा बाजारात आणण्यात आली. मात्र, यावेळी Crysta फक्त डिझेल इंजिन आणि मॅन्युअल गिअरबॉक्ससहच उपलब्ध करण्यात आली. Hycross च्या विक्रीवर परिणाम होऊ नये म्हणून ऑटोमॅटिक पर्याय जाणीवपूर्वक देण्यात आला नाही.
सध्या Toyota कडे Innova Crysta साठी कोणताही थेट रिप्लेसमेंट मॉडेल उपलब्ध नाही. आगामी काळात Mahindra, Tata किंवा Hyundai या कंपन्या ही पोकळी भरून काढण्यासाठी नवी MPV सादर करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.






