फोटो सौजन्य : England Cricket
भारताचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे यावेळी भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेला सुरुवात 20 जून पासून होणार आहे. त्याआधी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल होणार आहे. त्याचबरोबर भारताचा अ संघ देखील इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली यामध्ये भारताचा संघ शुभमन गिलच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. याआधी इंग्लंडचा संघ हा झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळत आहे. या मालिकेचा पहिला सामना पार पडला आहे या पहिल्या सामन्यात दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सामन्याचा संपूर्ण अहवाल वाचा.
झिम्बाब्वे आणि इंग्लंड यांच्यात २२ वर्षांनी कसोटी सामना खेळवण्यात आला. जिथे झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एर्विनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याला चुकीचे सिद्ध करून इंग्लंड संघाने ६ विकेट्सच्या मोबदल्यात ५६५ धावा केल्या आणि डाव घोषित केला. प्रत्युत्तरादाखल, झिम्बाब्वेचा एक डाव आणि ४५ धावांनी पराभव झाला. या सामन्यात पाकिस्तानी वंशाच्या इंग्लिश गोलंदाजाने ९ विकेट्स घेतल्या. हे पाहून भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलचाही टेन्शन वाढला आहे.
PBKS vs DC : श्रेयस अय्यरची अर्धशतकीय खेळी! पंजाब किंग्सचे दिल्ली कॅपिटल्ससमोर 207 धावांचे लक्ष्य
इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने १२४ धावा केल्या तर बेन डकेटने १४० धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ऑली पोपने १७१ धावांची शानदार खेळी केली. हॅरी ब्रुकनेही ५८ धावा जोडल्या. ज्यामुळे इंग्लंड संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. भारतीय संघाविरुद्धच्या मालिकेपूर्वी इंग्लिश फलंदाजांचे फॉर्ममध्ये येणे ही गिलसाठी चिंतेची बाब आहे. झिम्बाब्वेचा संघ पहिल्या डावात २६५ धावांवर सर्वबाद झाला. ज्यामध्ये ब्रायन बेनेटची १३९ धावांची खेळी देखील समाविष्ट होती. दुसऱ्या डावात झिम्बाब्वेचा संघ २५५ धावांवर सर्वबाद झाला. या डावात शॉन विल्यम्सने ८८ धावा केल्या तर सिकंदर रझाने ६० धावा केल्या, पण त्यानंतरही संघ ४५ धावांनी हरला.
Back with a bang! 💥
England secure their first win of the summer by an innings and 45 runs ‼️ pic.twitter.com/YUBpgfudyK
— England Cricket (@englandcricket) May 24, 2025
गोलंदाजीत, पाकिस्तानी वंशाचा फिरकी गोलंदाज शोएब बशीरने दोन्ही डावात ९ बळी घेतले. कर्णधार बेन स्टोक्सने दोन्ही डावात ३ बळी घेतले. भारताविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी सर्व इंग्लिश खेळाडूंचे फॉर्ममध्ये येणे कर्णधार शुभमन गिलसाठी अडचणीचे कारण बनले आहे. भारतीय संघ बऱ्याच काळानंतर इंग्लंडला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवण्याची तयारी करत आहे. दरम्यान, या सामन्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाचे टेन्शन वाढणार आहे.