जोस बटलर नवा रेकॉर्ड रचणार (फोटो- सोशल मीडिया)
आज भारत अन् इंग्लंडमध्ये शेवटचा टी 20 सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंड या सिरिजमध्ये 3-0 ने आघाडीवर आहे. भारतीय संघ एकही सामना जिंकू शकलेला नाहीये. आजच्या सामन्यात इंग्लंडचा विकेटकिपर जोस बटलरकडे दोन रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. आजच्या सामन्यात बटलर खेळल्यास सर्वाधिक टी 20 सामने खेळणारा दुसरा खेळाडू ठरणार आहे.
जोस बटलरने आजचा सामना खेळल्यास सर्वाधिक सामने खेळण्याचा दुसरा खेळाडू होण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर नोंद होईल. या सामन्यात तो रोहित शर्मा आणि जॉर्ज डॉकरेलला मागे टाकणार आहे. तसेच जोस बटलरकडे आणखी एक रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे. आजच्या सामन्यात त्याने एक सिक्स मारला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये विकेटकिपर म्हणून सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावर होणार आहे. या रेकॉर्डमध्ये तो एमएस धोनीला देखील मागे टाकणार आहे.
‘जो रन्स करत नाही किंवा ज्याच्या…’; Sanju Samson ला वगळल्याने भडकला पार्थिव पटेल?
सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जोस बाटलर विकेटकिपर म्हणून सर्वाधिक सिक्स मारण्याच्या यादीत महेंद्रसिंह धोनीबरोबर संयुक्त आहे. म्हणजे दोघांनी मारलेल्या सिक्सची संख्या समान आहे. दोघांनी 359 सिक्स मारले आहेत. त्यामुळे जोस बटलरने आज एक सिक्स मारला तर तो धोनीचा रेकॉर्ड मोडून पहिल्या स्थानावर पोहचणार आहे.
भारतीय क्रिकेट संघ गेल्या चार वर्षं[पासून टी 20 क्रिकेटमध्ये आयसीसी रॅंकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. मात्र कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरला जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर भारताने एकही टी 20 सामना जिंकलेला नाही. आयर्लंड दौऱ्यापासून भारताचा सतत पराभव होतो आहे. त्यामुळे भारतीय संघाचे आयसीसी रॅंकिंगमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. आजचा शेवटचा सामना इंग्लंडच्या संघाने जिंकल्यास इंग्लंडचा संघ आयसीसी रॅंकिंगमध्ये पहिल्या स्थानावर येणार आहे.
‘…तर त्याला खेळवू नका’; Sanju Samson ला वगळताच अभिषेक नायरचे मोठे विधान
भारत: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा/संजू सॅमसन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग.
इंग्लंड: फिल सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), जेकब बेथेल, हॅरी ब्रुक (कर्णधार), टॉम बँटन, विल जॅक्स, सॅम करन, जोफ्रा आर्चर, जोश टंग, आदिल रशीद, रेहान अहमद.






