फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
विराट कोहली-रोहित शर्मा : भारताच्या संघाला काल झालेल्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. याच पराभवासह भारताच्या संघाने तीनही सामन्यांमध्ये पराभूत झाल्यानंतर आता सोशल मीडियावर भारतीय संघाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामध्ये भारताच्या फलंदाजीवर विशेषतः प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि कॅप्टन रोहित शर्मा यांच्या फलंदाजांनी गेल्या अनेक सामन्यांपासून धावा काढल्या नाहीत. त्यामुळे त्याच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित होत आहेत. न्यूझीलंडविरुद्धही या दोघांनी धावा केल्या नाहीत. आता भारताची पुढील कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर होणार आहे. याआधी माजी पाकिस्तानी क्रिकेटर बासित अलीने विराट आणि रोहितच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) दुटप्पीपणाचा आरोपही केला आहे.
हेदेखील वाचा – Ajaz Patel: एजाज पटेलने वानखेडे स्टेडियमवर रचला ‘हा’ विश्वविक्रम; न्यूझीलंडच्या विजयाचा ठरला शिल्पकार
न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या तीनही सामन्यात भारताच्या संघाने फलंदाजीमध्ये निराश केले. भारताच्या युवा फलंदाजांनी प्रयत्न केले परंतु ते संघाला मालिकेचा एकही सामना जिंकवून देऊ शकला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर यासंदर्भात बरीच चर्चा होत आहे. यामध्ये आता पाकिस्तानचा माजी खेळाडूने त्याच्या युट्युब चॅनेलवर बासित अलीने प्रश्न उपस्थित केले आहेत.
बासित अली यांनी बीसीसीआयच्या दुटप्पीपणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, बीसीसीआयने यावर्षी देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य केले आहे जेणेकरून खेळाडू टीम इंडियामध्ये निवडीसाठी पात्र राहतील.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना बासितने असेही सांगितले की शुभमन गिल, ऋषभ पंत आणि यशस्वी जैस्वाल या नवीन खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे, तर रोहित आणि विराटची कामगिरी निराशाजनक आहे. तो म्हणाला, “नियमांनुसार निवडीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणे आवश्यक होते. सर्वांनी हा नियम पाळला, पण या दोघांना (विराट आणि रोहित) मोकळा लगाम देण्यात आला आहे.”
हेदेखील वाचा – KL Rahul : राहुलचा फ्लॉप शो! बॉर्डर गावस्कर ट्रॉफी आधी केएल खेळणार ही स्पर्धा
बासित यांनी पुढे असे सुचवले की विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी देशांतर्गत क्रिकेट खेळणे आवश्यक आहे. तो म्हणाला, “विराट कोहली फॉर्ममध्ये नाही आणि त्याने ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेट खेळावे. रोहितलाही कसोटी सामन्याचा सराव मिळत नसल्याने खेळणे आवश्यक आहे.”
2024 मधील विराट आणि रोहितची कसोटी आकडेवारी
रोहित शर्माने 2024 मध्ये आतापर्यंत 11 कसोटी सामने खेळले आहेत. या 11 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 29.40 च्या सरासरीने 588 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे.
विराट कोहलीने 2024 मध्ये आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत. या 6 कसोटी सामन्यांमध्ये त्याने 22.72 च्या सरासरीने 250 धावा केल्या आहेत. त्यात केवळ एका अर्धशतकाचा समावेश आहे.