फोटो सौजन्य - सोशल मीडिया
केएल राहुल : भारत विरुद्व न्यूझीलंड यांच्यामध्ये नुकतीच कसोटी मालिका झाली. यामध्ये भारताच्या संघाला ३-० ने मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. यामध्ये भारताच्या संघाने केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे आता सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमी भारतीय क्रिकेट संघावर प्रश्न उपस्थित करत आहेत. यामध्ये भारताच्या अनुभवी फलंदाजांनी सर्वात जास्त फलंदाजीमध्ये निराश केले आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा एक भाग होता. मात्र खराब फॉर्ममुळे त्याला या मालिकेत फक्त एकच सामना (पहिली कसोटी) खेळण्याची संधी मिळाली. मालिकेतील उर्वरित दोन कसोटीत राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकले नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआयने आता एक मोठे पाऊल उचलले आहे, जे राहुलसाठी पदोन्नतीच्या नव्हे तर पदावनतीच्या रूपात दिसले.
एक्सप्रेस स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर लक्ष ठेवून यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांचा भारत-अ संघात समावेश करण्यात आला आहे. भारत-अ संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उपस्थित असणार आहे. भारत-अ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दोन अनधिकृत कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे, त्यातील एक सामना पूर्ण झाला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर सुरू असलेली मालिका केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांना बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी चांगला सराव देऊ शकेल. भारत-अ आणि ऑस्ट्रेलिया-अ यांच्यातील दुसरा सामना 07 नोव्हेंबरपासून मेलबर्नच्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल.
केएल राहुल आणि ध्रुव जुरेल या दोघांना बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा भाग बनवण्यात आले आहे. 22 नोव्हेंबरपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थ येथे होणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना ३ जानेवारीपासून सिडनी येथे खेळवला जाणार आहे.
हेदेखील वाचा – IND VS NZ : हुश्श…भारतात येऊन न्यूझीलंडने बदलला इतिहास! मालिकेत टीम इंडियाला 3-0 केलं पराभूत
उल्लेखनीय आहे की, राहुलने डिसेंबर 2014 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याने 53 कसोटी खेळल्या आहेत. या सामन्यांच्या 91 डावांमध्ये फलंदाजी करताना राहुलने 33.87 च्या सरासरीने 2981 धावा केल्या आहेत. या काळात राहुलच्या बॅटमधून 8 शतके आणि 15 अर्धशतके झाली आहेत. राहुलचा कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या 199 धावा आहे. या काळात त्याच्या बॅटमधून 359 चौकार आणि 26 षटकार मारले गेले.
भारताच्या संघाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी १८ खेळाडूंच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक खेळाडूंना भारतीय संघामध्ये स्थान मिळाले आहे. भारताचा संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २२ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे भारताच्या संघासमोर ऑस्ट्रेलियाचे मोठे आव्हान असणार आहे. निराशाजनक कामगिरीमुळे भारताचा संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशाप्रकारे कामगिरी करेल हे पाहणं महत्वाचं ठरेल. भारताच्या संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी पाच सामने जिंकणे गरजेचे आहे.