स्टीव्ह स्मिथ आऊट होताच गौतम गंभीरचा जल्लोष, शिवीही दिली? सोशल मीडियावर धुमाकूळ
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा उपांत्य सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे. भारताचं या ट्रॉफीत शानदार प्रदर्शन राहिलं आहे. क्रिकेट प्रेमींमचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे. दरम्यान नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथला चांगली लय सापडली होती. त्याने सामन्यादरम्यान अनेक आकर्षक शॉट्स खेळले. आणखी थोडावेळ त्याने मैदानावर घालवला असता तर कांगारूंनी ३०० चा आकडा पार केला असता. मात्र ३७ व्या षटकात शमीचा एकच्या एका चेंडूवर तो बाद झाला. यावेळी भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीरचा उत्साह पाहण्यासारखा होता.
स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर, ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित असलेले भारतीय खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफ खूप आनंदी दिसत होते. संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर वेगळ्याच मूडमध्ये दिसला. त्याने गर्जना करून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी तो काहीतरी बडबडतानाही दिसला. पण तो काय म्हणाला? याची पुष्टी होऊ शकली नाही.
Gautam Gambhir after Steve Smith Wicket 🤣#INDvsAUS pic.twitter.com/NGWdTRxkQx
— Vikas Yadav (@VikasYadav66200) March 4, 2025
सामना सुरू होण्यापूर्वी अपेक्षेप्रमाणे झाले. अगदी तसेच घडले. आपल्या संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना स्मिथने एकूण ९६ चेंडूंचा सामना केला. दरम्यान, त्याने ७६.०४ च्या स्ट्राईक रेटने ७३ धावा केल्या. त्याच्या बॅटमधून चार चौकार आणि एक उत्कृष्ट षटकार आला. ३७ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर स्मिथ बाद झाला. त्यावेळी संघाची धावसंख्या १९८ वर पोहोचली होती.