फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी बीसीसीआयचा कार्यभार सोडून आता ते जागतिक क्रिकेट मंडळाचा कार्यभार सांभाळणार आहे. काही दिवसांपूर्वी यासंदर्भात बातम्या आल्या होत्या की, जय शाह हे आयसीसीचे अध्यक्ष म्हणून त्याची निवड करण्यात आली होती. आजपासून म्हणजेच १डिसेंबरपासून त्यांनी आता आयसीसीची कमान हातामध्ये घेतली आहे.
जय शहा यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. बीसीसीआयचे आउटगोइंग सचिव जय शहा यांनी भारतीय क्रिकेटला नव्या उंचीवर नेले आहे. आता तो क्रिकेटच्या सर्वोच्च मंडळात बसून जागतिक क्रिकेट चालवणार आहे. या जागतिक संघटनेचे नेतृत्व करणारे ते पाचवे भारतीय आहेत. छत्तीस वर्षीय शाह गेल्या पाच वर्षांपासून बीसीसीआयचे सचिव आहेत. आयसीसीच्या संचालक मंडळाने त्यांची एकमताने निवड केली होती. शाह यांनी न्यूझीलंडचे वकील ग्रेग बार्कले यांची जागा घेतली, ज्यांना सलग तिसऱ्यांदा पदावर राहण्यात रस नव्हता.
क्रीडाच्या संबंधित बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
जय शाह यांच्या आधी, उद्योगपती दिवंगत जगमोहन दालमिया, राजकारणी शरद पवार, वकील शशांक मनोहर आणि उद्योगपती एन. श्रीनिवासन यांनी जागतिक क्रिकेट संघटनेचे नेतृत्व केलेल्या भारतीयांमध्ये होते. भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शाह यांचा कार्यकाळ आव्हानांसह सुरू होईल कारण आयसीसीला पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ‘हायब्रिड मॉडेल’ लागू करण्यासाठी स्वीकारार्ह तोडगा काढण्याची गरज आहे.
A new chapter of global cricket begins today with Jay Shah starting his tenure as ICC Chair.
Details: https://t.co/y8RKJEvXvl pic.twitter.com/Fse4qrRS7a
— ICC (@ICC) December 1, 2024
आयसीसीच्या नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी 27 ऑगस्ट ही नामांकनाची अंतिम तारीख होती . जय शहा यांच्याशिवाय या पदासाठी निर्धारित वेळेपर्यंत कोणीही उमेदवारी केली नाही. यानंतर आयसीसीच्या कार्यकारी मंडळाने जय शाह यांना बिनविरोध विजयी घोषित केले. जय शाह यांनी आयसीसीचे कमान सांभाळून 35 वर्षीय आयसीसी अध्यक्ष बनणारा सर्वात तरुण बनला आहे. जय शाह 2019 पासून बीसीसीआय सचिव पदावर आहेत.
आयसीसी अध्यक्षांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. हा सहा वर्षांचा कार्यकाळ प्रत्येकी दोन वर्षांच्या तीन भागात विभागलेला आहे. न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले ४ वर्षे या पदावर राहिले. दोन वर्षांच्या तिसऱ्या टर्ममध्ये आपल्याला स्वारस्य नसल्याचे त्याने आयसीसीला सांगितले होते. तेव्हापासून जय शहा यांचा दावा सर्वात मजबूत मानला जात होता. अपेक्षेप्रमाणे जय शहा यांच्या विरोधात कोणीही निवडणूक लढवली नाही. अशा प्रकारे जय शहा यांची बिनविरोध निवड झाली.
चॅम्पियन ट्रॉफीचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. पाकिस्तानमध्ये ट्रॉफी दौऱ्यावर आहे त्यामुळे आता चॅम्पियन ट्रॉफीचे सामने फक्त पाकिस्तानमध्ये होणार की, स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळवली जाणार आहे यावर अजुनपर्यत आयसीसी कोणताही निर्णय समोर आला नाही. ठिकाण न ठरल्यामुळे अजुनपर्यत फेब्रुवारी २०२५ मध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचे वेळापत्रक आले नाही. आता जय शाह यांच्याकडे आजपासून आयसीसीची कमान हातामध्ये आली आहे त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफीचे सामने हायब्रीड पद्धतीने खेळवले जाऊ शकतात.