शुभमन गिल आणि पॅट कमिन्स(फोटो-सोशल मिडिया)
GT vs SRH : आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात आतापर्यंत ५० सामने खेळवण्यात आले आहेत. आज २ मे रोजी ५१ वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे. हैदराबादला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकावाच लागणार आहे, अन्यथा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून गाशा गुंडाळावा लागेल. तथापि, गुजरात हा सामना जिंकून प्लेऑफसाठी स्वतःची स्थिति अधिक भक्कम करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत दोन संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले आहेत. पहिला संघ चेन्नई सुपर किंग्ज तर दुसरा राजस्थान रॉयल्स आहे. पण आता जर हैदराबादला प्लेऑफमध्ये स्वतःला टिकवून ठेवायचे असेल तर मात्र त्यांना हा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. गुणतालिकेत गुजरात चौथ्या स्थानावर आहे तर हैदराबाद नवव्या स्थानावर आहे. चला तर मग आजच्या सामन्याचा तपशील जाणून घेऊया.
नरेंद्र मोदी स्टेडियममधील खेळपट्टी लाल आणि काळ्या मातीने तयार केली आहे. लाल मातीची खेळपट्टी चेंडूला उसळी देते, जी फलंदाजांना फटके खेळण्यास मदतगार ठरते. काळ्या मातीच्या खेळपट्टीवर उसळी सामान्य असली तरी, ती फिरकीपटूंना खूप मदत करणारी आहे. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७० धावा राहिली आहे. या आयपीएल हंगामात असे दिसून आले आहे की या स्टेडियममध्ये २०० धावा करणे सहज शक्य आहे.
AccuWeather च्या मते, २ मे रोजी अहमदाबादमध्ये खूप उष्णता असणार आहे. दिवसाचे कमाल तापमान ४२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान २७ अंशांपर्यंत राहण्याची अपेक्षा आहे. सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल, त्यामुळे यावेळी तापमान कमी राहणार आहे, तसेच पावसाची शक्यता नाही.
गुजरातने नरेंद्र मोदी स्टेडियमवर आतापर्यंत २० सामने खेळले आहेत, त्यापैकी त्यांनी १२ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ८ सामने गमावले आहेत. या मैदानावर जीटीचा सर्वोत्तम स्कोअर २३३ धावा राहिला आहे. त्याच वेळी, हैद्राबादने या मैदानावर ४ सामने खेळले असून त्यातील १ सामना जिंकला आहे आणि ३ सामने गमावले आहेत.
हेही वाचा : MI vs RR : Suryakumar Yadav ची धमाकेदार कामगिरी! IPL च्या इतिहासात ठरला पहिलाच फलंदाज..
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-११
गुजरात टायटन्स- शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शेरफेन रदरफोर्ड, जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, करीम जनात/इशांत शर्मा.
सनरायझर्स हैदराबाद- अभिषेक शर्मा, इशान किशन, ट्रॅव्हिस हेड, नितीश कुमार रेड्डी,सिमरजीत सिंग, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, कामिंदू मेंडिस, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जीशान अन्सारी, मोहम्मद शमी.