जोस बटलर(फोटो-सोशल मीडिया)
GT vs SRH : आयपीएल २०२५ चा ५१ व्या सामन्यात अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा ३८ धावांनी पराभव केला. हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत २२४ धावा केल्या. या सामन्यात कर्णधार शुभमन गिल आणि जोश बतलर यांनी शानदार अर्धशतके लागावली. या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरवार गुजरात संघ २०० धावांचा पल्ला ओलांडू शकला. या सामन्यात जोस बटलरने आयपीएलमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या आहेत. जोस बटलर ४००० धावा पूर्ण करणारा इंग्लंडचा पहिला खेळाडू बनला आहे. याशिवाय, तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद ४००० धावा पूर्ण करणारा चौथा फलंदाज ठरला.
जोस बटलरने आपल्या ११७ व्या आयपीएल सामन्याच्या ११६ व्या डावामध्ये ४००० धावा पूर्ण केल्या आहेत. या दरम्यान, बटलर ४००० धावा करणारा चौथा सर्वात जलद फलंदाज ठरला आहे. केएल राहुल, ख्रिस गेल आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यानंतर त्याने ही कामगिरी करून दाखवली आहे. बटलरला हे यश मिळवण्यासाठी फक्त १२ धावांची आवश्यकता होती. त्याने झीशान अन्सारीच्या चेंडूवर हा पराक्रम केला आहे.
आयपीएलमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांनी केलेल्या सर्वाधिक धावा
आयपीएल मध्ये सर्वात जलद ४००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केएल राहुलच्या नावावर नोंदवला आहे. केएल राहुलने त्याच्या १०५ व्या डावात ही कामगिरी करून दाखवली आहे. तर गेलने ११२ डावांमध्ये आणि डेव्हिड वॉर्नरने ११४ व्या डावात ही कामगिरी केली आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी चेंडूत ४००० धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. बटलरने २६७७ चेंडूत ४००० धावा पूर्ण केल्या आहेत. गेलने २६५३ चेंडूतच ४००० धावांचा टप्पा गाठला होता. तर एबी डिव्हिलियर्सने २६५८ चेंडूत ही कामगिरी केली होती. या यादीत सूर्यकुमार यादव २७१४ चेंडूंसह चौथ्या स्थानावर आहे.
हेही वाचा : ‘मला कोणतीही नोटीस मिळाली नाही’ KCA ने लादलेल्या 3 वर्षांच्या बंदीबाबत श्रीशांतने सोडले मौन