फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
एस श्रीशांत : सध्या आयपीएल २०२५ चा १८ वा सिझन राजस्थान रॉयल्ससाठी फार काही चांगला राहिला नाही. विशेषतः संजू सॅमसनसाठी हा सिझन त्रासदायक राहिला आहे. पहिल्या तीन सामन्यात तो दुखापतीमुळे तो संघाचे नेतृत्व करू शकला नाही. त्यानंतर त्याच्या राजस्थान रॉयल्सची कमान देण्यात आली होती यामध्ये त्याने त्याच्या नेतृत्वात संघाने १ सामना जिंकला होता. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाविरुद्ध चालू सामन्यात त्याला दुखापत झाली आणि त्याला रिटायर आऊट करण्यात आले आहेत.
आयपीएल २०२५ च्या सीझनमध्ये संजू सॅमसन इंज्युरी झाली होती, त्यामुळे तो राजस्थान रॉयल्सच्या बऱ्याच सामन्यांमध्ये नेतृत्व करू शकला नाही. याचा परिणाम संघाच्या कामगिरीवरही झाला आणि संघ चांगला खेळू शकला नाही. परिणामी राजस्थान रॉयल्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले. दरम्यान, देशांतर्गत क्रिकेटमध्ये संजू सॅमसन केरळ संघाकडून खेळतो. तिथे माजी भारतीय क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने त्याच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. आता केरळ क्रिकेट असोसिएशनने या प्रकरणात मोठे पाऊल उचलले आहे आणि श्रीशांतवर तीन वर्षांची बंदी घातली आहे.
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा झाली यावेळी संजू सॅमसनला त्यात स्थान मिळाले नव्हते त्यामुळे सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता. यानंतर, एस श्रीसंतने एक वादग्रस्त विधान केले, जे खोटे आणि अपमानजनक होते. या विधानाबाबत, केरळ क्रिकेट असोसिएशनने ३० एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत श्रीशांतवर तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
🚨 Former Indian cricketer S Sreesanth has been suspended for three years by the Kerala Cricket Association (KCA) due to accusations of making false and defamatory statements about the organization. The suspension comes in the wake of a controversy surrounding Sanju Samson’s… pic.twitter.com/IpjE2lbdEl
— The Tradesman (@The_Tradesman1) May 2, 2025
श्रीशांत सध्या केरळ क्रिकेटमधील कोल्लम एरीज संघाचा सह-मालक आहे. बंदीचा निर्णय घेण्यापूर्वी, केसीएने श्रीशांत, कोल्लम संघ, अलाप्पुझा संघाचे प्रमुख आणि अलाप्पुझा रिपल्स यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती. याशिवाय, केसीएने संजू सॅमसनचे वडील सॅमसन विश्वनाथ आणि इतर दोघांवरही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यावर संजू सॅमसनच्या नावाने खोटे आरोप केल्याचा आरोप आहे, ज्यासाठी केसीए नुकसान भरपाईची मागणी करेल.
एका मल्याळम टीव्ही चॅनेलवरील चर्चेदरम्यान एस श्रीसंतने केरळ क्रिकेट असोसिएशन (केसीए) वर संजू सॅमसनला पाठिंबा दिल्याचा आरोप केला होता. विजय हजारे ट्रॉफीसाठी केरळ संघातून संजूला वगळण्यात आल्यामुळे २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याच्या भारतीय संघातील निवडीवर परिणाम झाला, असे त्याने म्हटले होते. श्रीशांतच्या या विधानावर केसीए संतापले आणि त्यामुळेच त्यांनी आता त्याच्यावर कडक कारवाई करत त्याला तीन वर्षांसाठी बंदी घातली आहे. तथापि, केसीएने या प्रकरणात ज्या फ्रँचायझी संघांना नोटीस पाठवल्या होत्या त्यांचे उत्तर समाधानकारक वाटले. त्यामुळे केसीएने त्या संघांवर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.