फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad/Gujarat Titans सोशल मीडिया
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायट टॉस अपडेट : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना सुरू झाला आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यात हैदराबादच्या फलंदाजीकड़े चाहत्याचे लक्ष असणार आहे. तर गुजरात टायटन्सचे सलामीवीर फलंदाज साई सुदर्शन आणि शुभमन गिल हे दोन्ही फलंदाज सध्या दमदार फॉर्ममध्ये आहेत. मागील सामन्यात गुजरात टायटन्सच्या संघाला राजस्थान रॉयल्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.
मागील सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे संघ आज संघामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. तर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने मागील सामन्यात विजय मिळवला होता त्यामुळे संघ आज विजयाच्या उद्देशानेच मैदानामध्ये उतरेल. साई सुदर्शन ऑरेंज कॅपच्या लढतीत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने यंदा खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अभिषेक शर्माने या सीझनमध्ये शतक झळकवले आहे पण तो सर्व उर्वरित सामन्यात मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला आहे. आज तो कशी कामगिरी करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.
🚨 Toss 🚨@SunRisers won the toss and elected to field against @gujarat_titans
Updates ▶ https://t.co/u5fH4jQrSI#TATAIPL | #GTvSRH pic.twitter.com/IEMnrgyUTA
— IndianPremierLeague (@IPL) May 2, 2025
गुजरात टायटन्ससाठी या सीझनमध्ये सर्वाधिक धावा साई सुदर्शनने केले आहेत. साई सुदर्शन याने संघासाठी ४५६ धावा केल्या आहेत. तर त्यानंतर दुसऱ्या स्थानावर जोस बटलर आहे त्याने आतापर्यत ४०६ धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्ससाठी तिसऱ्या स्थानावर शुभमन गिल आहे संघासाठी ३८९ धावा केल्या आहेत. प्रसिद्ध कृष्णांने गुजरात टायटन्ससाठी सर्वाधिक विकेट घेतले आहेत त्याने संघासाठी १७ विकेट आतापर्यत घेतले आहेत. त्याचबरोबर मोहम्मद सिराज आणि साई किशोर या दोघांनी प्रत्येकी १२ विकेट घेतले आहेत.
शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, राहुल तेवतीया, राशिद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णां, जेराल्ड कोएत्झी
इम्पॅक्ट प्लेयर – इशांत शर्मा, महिपाल लोमरोर, अनुज रावत, अर्शद खान, शेरफेन रडरफर्ड
पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ईशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, कमिंडू मेंडिस, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, जिशान अन्सारी, मोहम्मद शमी
इम्पॅक्ट प्लेयर – ट्रॅव्हिस हेड, अभिनव मनोहर, सचिन बेबी, राहुल चाहर, वियान मूलडर