मोहम्मद सिराज आणि गौतम गंभीर(फोटो-सोशल मीडिया)
Mohammad Siraj came running for Gautam Gambhir : गुवाहाटी येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला ४०८ धावांनी लोळवले. या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर भारतीय चाहत्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. चाहत्यांनी गंभीरला बघून “गौतम गंभीर हाय-हाय” अशा घोषणा दिल्या, तेव्हा मोहम्मद सिराजने आपल्या प्रशिक्षकासाठी धाव घेऊन काही चाहत्यांची मने जिंकली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने त्याच्या प्रशिक्षकासाठी जी कृती केली त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. काही चाहत्यांनी “गौतम गंभीर हाय-हाय” अशा घोषणा दिल्या. प्रशिक्षकाने तेव्हा गॅलरीकडे पाहिले, नंतर आपला चेहरा बाजूला केला आणि शांत राहिला. या दृश्याने लगेच खेळाडूंचे लक्ष वेधून घेतले. एका क्षणी, प्लेइंग इलेव्हनमधील अनेक सदस्य गोंधळाचा सामना करण्यासाठी पुढे आले. परंतु नंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजकडून गर्दीला शांत राहण्याचा इशारा देण्यात आला. सिराज आणि सहाय्यक प्रशिक्षक सितांशू कोटक गॅलरीत गेले आणि त्यांनी शांततेचे आवाहन केले. या व्हिडिओवर चाहत्यांकडून असंख्य प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
२०२४ च्या टी-२० विश्वचषकानंतर गौतम गंभीरला भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आले. गंभीरच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाने एकदिवसीय आणि टी-२० मध्ये चांगली कामगिरीचे प्रदर्शन केले. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये संघाची कामगिरी सातत्याने घसरत असल्याचे दिसून येत आहे. भारतीय संघ घरच्या मैदानावर ढेपळताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला ०-२ असा कसोटी मालिकेतील पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने १९३२ मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिली कसोटी खेळली होती. भारताने त्यांची पहिली घरची कसोटी मालिका १९३३-३४ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. तेव्हापासून, भारतीय संघाला फक्त तीन घरच्या कसोटी मालिकांमध्ये क्लीन स्वीपचा सामना करावा लागला आहे. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर यापैकी दोन क्लीन स्वीपचा समावेश आहे.
pic.twitter.com/Bukj6qQuhO — R✨ (@264__ro) November 26, 2025
हेही वाचा : Ind vs Sa 2nd Test: अरेरे..!भारतापेक्षा पाकची कामगिरी सरस! एका वर्षात दुसऱ्यांदा व्हाईट वॉश
१९९९-२००० मध्ये भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून दोन कसोटी सामन्यांची कसोटी मालिकेत ०-२ असा पराभव स्वीकाराव लागला. भारताला घरच्या मैदानावर क्लीन स्वीपचा सामना करण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. त्यानंतर, भारतीय संघाने घरच्या मैदानावर मालिकेतील सर्व कसोटी न गमावण्याचा विक्रम कायम ठेवला.






