Top-10 Most Expensive Player In IPL 2025 Retention : IPL 2025 पूर्वी, सर्व संघांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. रिटेन केलेल्या काही खेळाडूंवर भरपूर पैशांचा वर्षाव करण्यात आला, ज्यामध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेन अव्वल क्रमांकावर राहिला. क्लासेनला हैदराबादने 23 कोटी रुपयांना कायम ठेवले. चला तर मग जाणून घेऊया कोणते खेळाडू आहेत ज्यांना सर्वाधिक किमतीत कायम ठेवण्यात आले आहे.
१०- राशिद खान (गुजरात टायटन्स)
अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशीद खानला गुजरात टायटन्सने 18 कोटींची किंमत देऊन कायम ठेवले.
०९- पॅट कमिन्स (सनराईजर्स हैदराबाद)
ऑस्ट्रेलियाचा पांढऱ्या चेंडूचा कर्णधार पॅट कमिन्स, ज्याने गेल्या मोसमात सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद भूषवले होते, त्याला फ्रेंचायझीने १८ कोटी रुपये देऊन कायम ठेवले होते. कमिन्सला हैदराबादने गेल्या हंगामात म्हणजेच आयपीएल 2024 मध्ये 20.5 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
०८- यशस्वी जैस्वाल (राजस्थान रॉयल्स)
राजस्थान रॉयल्सकडून खेळणारा भारताचा स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वालला आयपीएल 2025 पूर्वी 18 कोटी रुपये देऊन फ्रँचायझीने कायम ठेवले होते.
०७- संजू सॅमसन (राजस्थान रॉयल्स)
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला राजस्थान रॉयल्सने 18 कोटी रुपयांना कायम ठेवले आहे.
०६- जसप्रीत बुमराह (मुंबई इंडियन्स)
मुंबई इंडियन्सने भारतीय क्रिकेट संघाचा सुपरस्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला १८ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
०५- रवींद्र जडेजा (चेन्नई सुपर किंग्स)
चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा याला फ्रँचायझीने १८ कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले.
०४- रुतुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्स)
आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार असलेला भारतीय सलामीवीर रुतुराज गायकवाड याला फ्रँचायझीने 18 कोटी रुपयांच्या किमतीत कायम ठेवले.
०३- निकोलस पूरन (लखनौ सुपर जायंट्स)
लखनौ सुपर जायंट्सने वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनवर पैशांचा वर्षाव केला. कॅरेबियन यष्टीरक्षक फलंदाजाला लखनौने २१ कोटी रुपये देऊन कायम ठेवले.
०२- विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विराट कोहलीला २१ कोटी रुपयांना रिटेन केले. कोहली हा भारतीय खेळाडू होता ज्याला सर्वाधिक किंमत देऊन कायम ठेवण्यात आले होते.
०१- हेन्रिक क्लासेन (सनराईजर्स हैदराबाद)
IPL 2025 पूर्वी कायम ठेवल्या जाणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा हेनरिक क्लासेन अव्वल स्थानी आहे. सनरायझर्स हैदराबादने क्लासेनला २३ कोटी रुपयांना कायम ठेवले.