न्यूझीलंडची सुझी बेट्सने रचला असा विश्वविक्रम (Photo Credit- X)
Suzie Bates World Record: सध्या भारताता आयसीसी महिला विश्वचषक २०२५ खेळवला जात आहे. तर आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात न्यूझीलंडची खेळाडू सूझी बेट्सने (Suzie Bates) इतिहास रचला आहे. ही कामगिरी करणारी ती जगातील पहिली खेळाडू ठरली. तिच्या आधी इतर कोणत्याही खेळाडूने ही कामगिरी केलेली नव्हती. पण आता ती या यादीतील पहिली खेळाडू बनली आहे. एकही कसोटी सामना न खेळता ३५० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी सुझी जगातील पहिली खेळाडू बनली आहे.
एकही कसोटी सामना न खेळता ३५० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी सुझी बेट्स जगातील पहिली खेळाडू बनली आहे. यापूर्वी इतर कोणत्याही खेळाडूने ही कामगिरी केलेली नव्हती. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तिने आतापर्यंत एकही कसोटी सामना न खेळता ३०८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या यादीत न्यूझीलंडची सोफी डेव्हाईन तिसऱ्या क्रमांकावर आहे, तिने ३०० आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळले आहेत.
Suzie Bates becomes the first to 350 women’s internationals as Sophie Devine hits 300 🇳🇿 pic.twitter.com/cdqdR61XoW — ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 6, 2025
इंदौर येथील होळकर मैदानावर खेळण्यात येणाऱ्या सामन्यात सुझी बेट्स दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना संस्मरणीय बनवू शकली नाही. पहिल्याच चेंडूवर तिची विकेट गमावून ती गोल्डन डकवर पडली. तिच्या बाद झाल्यामुळे न्यूझीलंडवर दबाव निर्माण झाला.
३८ वर्षीय सुझी बेट्सने न्यूझीलंडसाठी १७२ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये तिने ३९.५७ च्या सरासरीने ५,८९६ धावा केल्या आहेत. तिने १३ शतके आणि ३७ अर्धशतके केली आहेत. १७७ टी-२० सामन्यांमध्ये तिने २९.११ च्या सरासरीने ४,७१६ धावा केल्या आहेत. टी-२० सामन्यांमध्ये तिने २८ अर्धशतके आणि एक शतक केले आहे.
सुझी बेट्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण कधी केले?
सुझी बेट्सने मार्च २००६ मध्ये भारताविरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
महिला क्रिकेटमध्ये ३०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या कोणत्या खेळाडू आहेत?
सुझी बेट्स, हरमनप्रीत कौर, ऑलिस पेरी, मिताली राज, चार्लोट एडवर्ड्स, डॅनी वायट आणि सोफी डेव्हाईन या अशा खेळाडू आहेत ज्यांनी ३०० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.