फोटो सौजन्य - सोशल मीडिया
निकोलस पुरण : वेस्ट इंडिजचे फलंदाज म्हणजेच धावांचा पाऊस करणार हे पक्के, अशी समज संपूर्ण जगामधील क्रिकेट प्रेमींची आहे. वेस्ट इंडिजचे अनेक दिग्गज होऊन गेले यामध्ये कार्लोस ब्रॅथवेट, क्रिस गेल अजून बरेच दिग्गज फलंदाज ज्यांना गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी घाबरत होते. आता वेस्ट इंडिजच्या आणखी एका दमदार खेळाडूंनी एक मोठा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजचा दमदार फलंदाज निकोलस पूरनने आपल्या नावावर एक मोठा विक्रम केला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अवघ्या ८ महिन्यांत पुरणने आपल्याच देशाचा माजी दिग्गज ख्रिस गेलचा विक्रम मोडला आहे.
पूरण हा आयपीएल असो किंवा आंतरराष्ट्रीय सामने असो तो नेहमीच चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडण्यात कमी पडत नाही. पूरण आता एका वर्षात T२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. निकोलस पुरण सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. पूरणसमोर मोठे गोलंदाजही फिके दिसतात. पुरणने आपल्या तुफानी फलंदाजीने सर्वांचेच होश उडवले आहेत. पुरणने या वर्षाच्या आठ महिन्यांत असे षटकार ठोकले की ख्रिस गेलचा विक्रम मोडीत निघाला. देशाच्या फ्रेंचाइजी लीग कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. यावर्षी पुरण त्रिनबागो नाइट रायडर्स संघाचा भाग आहे. या मोसमातील आपल्या पहिल्याच सामन्यात पुरणने ९७ धावांची शानदार खेळी केली. या काळात त्याच्या बॅटमधून ७ चौकार आणि ९ षटकार आले.
हेदेखील वाचा – Paris Paralympics 2024 LIVE : भारताचे पॅरा बॅडमिंटपटू लढणार सेमीफायनल फेरीसाठी! वाचा लाईव्ह अपडेट
पुरणने या वर्षात म्हणजे २०२४ मध्ये आतापर्यंत १३९ षटकार मारले आहेत. यासोबत एका वर्षात T२० मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. यापूर्वी हा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर होता. गेलने २०१५ मध्ये १३५ षटकार मारले होते. मात्र, आता ९ वर्षांनंतर पुराणने हा विक्रम मोडला आहे.