(फोटो- जय शाह/ ट्विटर)
राजधानी: भारताच्या संघाची दोन सामान्यांची कसोटी मालिका बांग्लादेशविरुद्ध आयोजित करण्यात आली आहे. यामधील पहिल्या सामना भारताने नावावर केला आहे. भारताच्या संघाने बांग्लादेशला २८० धावांनी पराभूत केलं आहे. आता भारताच्या संघाने चारही दिवस दमदार कामगिरी करत मालिकेचा पहिली कसोटी नावावर केली आहे. या विजयामुळे भरताना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे आगेकूच केली आहे. फायनल खेळण्यासाठी आपला दावा आणखी मजबूत केला आहे. आता टीम इंडियाला डब्ल्यूटीसी फायनल खेळण्यासाठी किती सामने जिंकावे लागतील व त्याचे गणित कसे असेल, ते जाणून घेऊयात.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ -२०२५ मध्ये फायनल खेळण्यासाठी भारत सर्वोत्तम कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. या फायनलच्या पॉईंटन्स टेबलमध्ये भारताने आपली पकड मजबूत केली आहे. बांगलादेशविरुद्ध पहिला सामना जिंकल्यानंतर भारताच्या खात्यात ८६ गुण जमा झाले आहेत. ७१. ७६ च्या टक्केवारीनुसार, भारत या पॉईंट्स टेबलमध्ये आघाडीवर आहे.
(फोटो- icc)
बांगलादेशला पराभूत करण्याआधी भारताने वेस्ट इंडिजला १-० आणि इंग्लंड संघाला ४-१ अशा फरकाने पराभूत केले आहे. आता २ सामन्यांच्या मालिकेत भारताने बांगलादेशविरुद्ध १-० अशी आघाडी घेतली आहे. यापुढे भारताला बांगलादेशविरुद्ध १ आणि न्यूझीलंडविरुद्ध ३ आणि औट्रेलियाविरुद्ध ५ कसोटी सामने खेळायचे आहेत. यंदाच्या हंगामात टीम इंडियाने एकही कसोटी सामना हरलेला आहे.
आयसीसीच्या माहितीनुसार, भारताला ९ पैकी ६ कसोटी सामने जिंकावे लागणार आहेत. यामध्ये बांगलादेशविरुद्ध १ आणि न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी सामने भारत मायदेशात खेळणार आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धचे ५ कसोटी सामने परदेशात खेळावे लागणार आहेत. डब्ल्यूटीसी फायनलमध्ये जाण्यासाठी भारतात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या दोन क्रमांकांवर असणे आवश्यक आहे.
Fantastic start for Team India in this year's red-ball season! Absolutely loved watching @ashwinravi99’s calculated knock in the first innings and his match-winning spell in the second. 🤩 @ShubmanGill and @imjadeja were brilliant with the bat and special shoutouts to… pic.twitter.com/9UDLhXDBoV
— Jay Shah (@JayShah) September 22, 2024
बांगलादेशविरुद्ध जिंकला १ ला सामना
भारताच्या संघाने बांग्लादेशला २८० धावांनी पराभूत केलं आहे. आता भारताच्या संघाने चारही दिवस दमदार कामगिरी करत मालिकेचा पहिली कसोटी नावावर केली आहे. भारताच्या फलंदाजांनी त्याचबरोबर गोलंदाजांनी देखील चमत्कार करून दाखवला. पहिल्या इनिंगमध्ये रविचंद्रन अश्विनने त्याच्या होम ग्राउंडवर शतक ठोकलं. रवींद्र जडेजाने देखील कमालीची कामगिरी करत महत्वाची भूमिका बजावली. भारताच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये ३७६ धावांची धुव्वादार खेळी खेळली. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी बांग्लादेशला पहिल्या इनिंगमध्ये जास्त वेळ टिकू दिले नाही. टीम इंडियाने बांग्लादेशला पहिल्या इनिंगमध्ये १४९ धावांवर सर्वबाद केले.