ट्रॅव्हिस हेड(फोटो-सोशल मीडिया)
MI vs SRH : आयपीएल २०२५ चा ३३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात याला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने हैद्राबादचा पराभव केला. प्रथम फलंदाजी करत हैद्राबादने १६२ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात मुंबई इंडियन्सने १९ ओव्हरमध्ये ६ गड्यांच्या बदल्यात हे लक्ष्य पूर्ण केले. जरी हैद्राबादला पराभवाचा सामना करावा लगाला असला तरी या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा आक्रमक फलंदाज ट्रॅव्हिस हेडने एक भीम पराक्रम केला आहे. ट्रॅव्हिस हेड आयपीएल इतिहासात सर्वात जलद १००० धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने हा इतिहास रचला आहे.
ट्रॅव्हिस हेडने आयपीएलमध्ये फक्त ५७५ चेंडूंचा सामना करत १००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम रचला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध हेडने २८ धावा केल्या. यादरम्यान, त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील १००० धावा देखील पूर्ण केल्या. २०२४ पासून सनरायझर्स हैदराबादसाठी ओपनिंग करताना ट्रॅव्हिस हेडने ही कामगिरी केली.
हेही वाचा : IPL 2025: वानखेडे स्टेडियमवर ‘हिटमॅन’ चा दबदबा! Rohit Sharma, कडून IPL इतिहासातील मोठ्या विक्रमाला गवसणी
हेड १००० धावा करणारा दुसरा सर्वात जलद फलंदाज ठरला आहे. या यादीमध्ये आंद्रे रसेल पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. ज्याने ५४५ चेंडूत १००० धावा पूर्ण केल्या आहेत. या यादीमध्ये हैदराबादचा फलंदाज हेनरिक क्लासेनचा देखील समावेश आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने ५९४ चेंडूत ही कामगिरी करून दाखवली आहे.
१००० आयपीएल धावा पूर्ण करण्यासाठी घेतलेले सर्वात कमी चेंडू
हेही वाचा : MI vs SRH : सूर्यकुमार यादव ‘हे’ काय करून बसला? लाईव्ह सामन्यात अभिषेक शर्माचे तपासले खिसे अन्… पहा व्हिडिओ
सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या ट्रॅव्हिस हेडने आयपीएलमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह, तो आयपीएलमध्ये १००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा ९९ वा फलंदाज बनला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळण्यापूर्वी ट्रॅव्हिस हेडने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून काही सामने खेळले आहेत.
ट्रॅव्हिस हेडने आतापर्यंत त्याने ३२ आयपीएल सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ३७.२५ च्या सरासरीने आणि १७४.०६ च्या स्ट्राईक रेटने १००६ धावा पूर्ण केल्या आहेत. त्याच्या ३२ व्या सामन्याच्या अखेरीस, त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५७८ चेंडूंचा सामना केला आहे. त्यामध्ये त्याने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत २५८ सामन्यांमध्ये ८२५२ धावा केल्या आहेत. त्यानंतर शिखर धवन ६७६९ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर रोहित शर्मा २६२ सामन्यांमध्ये ६६८४ धावा करून तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.