एलिसा हीली आणि हरमनप्रीत कौर(फोटो-सोशल मीडिया)
India Women vs Australia Women Team Women’s World Cup Match: आयसीसी महिला विश्वचषकात भारताची विजयी मलिका दक्षिण आफ्रिकेने खंडित केली आहे. त्यानंतर भारतीय संघाला आता ऑस्ट्रेलियासोबत दोन हात करावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियन महिला संघ आणि भारतीय महिला संघ १२ ऑक्टोबर रोजी, विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी स्टेडियमवर आमनेसामने येणार आहे. या सामन्यात भारतीय संघ विजयाची हॅटट्रिक साजरी करण्यावर लक्ष्य कएडरीत अकरणार आहे. या दरम्यान, भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला एका विक्रमाची संधी देखील असणार आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : मोहसिन नक्वीची आता खैर नाही! ICC मधून होणार हकालपट्टी? BCCI चा मोठा निर्णय..
या विश्वचषकात भारतीय महिला संघाने श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध सलग दोन विजय मिळवले आहे. परंतु दक्षिण आफ्रिकेकडून त्यांना या विजयी मालिकेत पहिला पराभव पत्करावा लागला. आता, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरुद्ध दोन सामने जिंकले आणि श्रीलंकेविरुद्धचा त्यांचा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. गतविजेता ऑस्ट्रेलिया संघ आता या स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी प्रयत्न करणारत आहे.
महिला एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया १३ वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी ऑस्ट्रेलियालाने १० वेळा विजय मिळवला आहे, तर भारतीय महिला संघाने २०१७ च्या उपांत्य फेरीसह तीन संस्मरणीय विजय मिळवले आहेत. २०१७ पासून टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला पराभूत करता आलेले नाही. दरम्यान, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर एका खास विक्रमावर लक्ष ठेवून आहेत.
भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर महिला एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम करण्याची शक्यता आहे. सध्या, सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या सोफी डेव्हाईनच्या नावावर जमा आहे. महिला विश्वचषकात आतापर्यंत २८ सामन्यांमध्ये सोफीने २३ षटकार ठोकले आहेत. तर वेस्ट इंडिजची फलंदाज डिआंड्रा डॉटिन दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे, तिने २९ सामन्यांमध्ये २२ षटकार लगावेल आहेत. या यादीत कर्णधार हरमनप्रीत कौर या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, तिने आतापर्यंत २९ सामन्यांमध्ये २० षटकार खेचले आहेत. जर तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार षटकार मारले तर ती हा विक्रम मोडण्याची शक्यता आहे.
भारतीय महिला संघ
प्रतीका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, रिचा घोष, श्री चरणी, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, अमनजोत कौर, उमा छेत्री, अरुंधती रेड्डी, राधा यादव.
ऑस्ट्रेलिया महिला संघ
बेथ मूनी, एलिसा हीली (कर्णधार), अॅनाबेल सदरलँड, अॅशले गार्डनर, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, किम गार्थ, अलाना किंग, डार्सी ब्राउन, जॉर्जिया वॉल, जॉर्जिया वेअरहॅम, मेगन शट, हीथर ग्राहम, फोबे लिचफिल्ड.