फोटो सौजन्य - BCCI
भारत विरुद्ध झिम्बाब्वे : भारताचा युवा संघ आज झिम्बाब्वेसोबत लढणार आहे. आजच्या या सामन्यात भारताचे सर्व युवा खेळाडू दिसणार आहेत. त्याचबरोबर कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे. भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये पाच सामान्यांची मालिका होणार आहे. यामध्ये शुभमन गिलकडे कर्णधार पदाची कमान देण्यात आली आहे. तर व्हीव्हीएस लक्ष्मणला तात्पुरते प्रशिक्षक पद देण्यात आले आहे. त्याचबरोबर आशिया खेळांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार ऋतुराज गायकवाड सुद्धा या संघामध्ये सामील आहे. परंतु तो या मालिकेमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात उतरणार नाही अशी माहिती समोर आली आहे.
कॅप्टन शुभमन गिलने पत्रकार परिषदेमध्ये काही संघांबद्दल खुलासे केले आहेत. प्लेइंग ११ मध्ये कोणत्या खेळाडूला संधी मिळणार आहे याबाबतीत त्याने मनोरंजक खुलासे केले आहेत. या मालिकेत एक नवी ओपनिंग जोडीही दिसणार आहे. ज्यामध्ये ऋतुराज गायकवाडला ओपनिंगपासून दूर ठेवले जाऊ शकते. त्याने पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, या मालिकेत जो खेळाडू त्याच्यासोबत डावाची सुरुवात करेल तो ऋतुराज गायकवाड नसून त्याचा पंजाबचा सहकारी अभिषेक शर्मा असेल. माझ्यासोबत अभिषेक शर्मा ओपनिंग करेल आणि रुतुराज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, असे गिल म्हणाला.
भारताचे T-२० फॉरमॅटमधील दोन दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या T२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर टीम इंडियासाठी ओपनिंग बॅट्समनची जागा रिक्त आहे. या मालिकेत ही पोकळी भरून काढण्यासाठी गिल आणि अभिषेक आपला दावा ठोकण्याचा प्रयत्न करतील.
पुढे शुभमन आपल्या नव्या संघावर झिम्बाब्वेमध्ये चांगली कामगिरी करण्याचे दडपण आहे, असेही गिल म्हणाला. “जेव्हाही तुम्ही सामना खेळता तेव्हा दडपण असते. कोणत्याही प्रकारचा सामना किंवा परिस्थितीत खेळताना दडपण नसेल, तर तो सामना खेळण्यात काही अर्थ आहे, असे मला वाटत नाही.”