Virender Sehwag Divorce : वीरेंद्र सेहवाग आणि आरती Gey Divorce च्या वाटेवर; कोणत्या प्रकारचा आहे हा 'डिवोर्स'; मलाईका अरोरानेसुद्धा घेतला असाच घटस्फोट
Virender Sehwag Divorce : वीरेंद्र सेहवाग आणि आरती सेहवाग यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चांना वेग येत आहे. वीरेंद्र सेहवाग आणि आरती यांचा 20 वर्षांचा संसार मोडणार आह. परंतु, ते Grey Divorce च्या माध्यमाने एकमेकांपासून विभक्त होणार आहेत. ज्याप्रमाणे मलायका अरोरा आणि अरबाज खान तसेच कमल हसन आणि सारिका ठाकूर एकमेकांपासून वेगळे झाले त्याचप्रमाणे वीरू आणि आरती Grey Divorce च्या प्रक्रियेत वेगळे होऊ शकतात.
अनेक दिग्गज सेलिब्रेटीनी घेतला असा घटस्फोट
भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि आरती सेहवाग यांच्या घटस्फोटाच्या अफवांना वेग येत आहे. ४६ वर्षीय वीरूने त्याची दूरची नातेवाईक असलेल्या आरती हिच्याशी प्रेमविवाह केला होता. आता त्यांच्या उतारवयात, दोघेही वेगळे होणार आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि आरती यांच्यात ग्रे घटस्फोट होऊ शकतो अशा चर्चांना वेग येत आहे. हाच मार्ग दक्षिणेतील सुपरस्टार कमल हसन आणि त्यांची पत्नी सारिका ठाकूर यांनी आधीच स्वीकारला आहे. त्याच धर्तीवर सेहवाग आणि आरती वेगळे होतील. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनीही हाच मार्ग अवलंबला.
काय आहे ग्रे डिवोर्स
वीरेंद्र सेहवागचे २००४ मध्ये लग्न झाले. त्यांचे दोन्ही मुलगे आर्यवीर आणि वेदांत हेदेखील क्रिकेटमध्ये आपले करिअर घडवत आहेत. सेहवाग आणि आरतीच्या विभक्त होण्याच्या बातमीने क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. आता प्रश्न असा उद्भवतो की, आरती आणि सेहवाग हे ग्रे घटस्फोट कसा घेऊ शकतात? याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. खरं तर, ग्रे घटस्फोट म्हणजे घटस्फोट घेण्याची प्रक्रिया जी म्हातारपणात घेतली जाते. पूर्वी भारतात ग्रे-डिव्होर्सला स्थान नव्हते. तथापि, आजच्या काळात महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्यामुळे, त्याचा ट्रेंड वाढला आहे. हे स्वातंत्र्य त्यांना रोजच्या संघर्षांपासून दूर राहून वैयक्तिक आनंद आणि समाधानाच्या आधारे वैवाहिक जीवनातून बाहेर पडण्यास मदत करते.
ग्रे घटस्फोटाशी संबंधित कायदेशीर मुद्दे
ग्रे घटस्फोट हा ३० आणि ४० च्या दशकात होणाऱ्या घटस्फोटापेक्षा वेगळा आहे. कारण आजच्या काळात पती-पत्नी दोघेही कमावते आहेत. अशा परिस्थितीत, दोघांनी मिळून सुमारे दोन ते तीन दशकांत भरपूर संपत्ती जमा केली असती. त्यांना त्याच्या विभाजनाशी संबंधित कायदेशीर आव्हानांना तोंड द्यावे लागते. याशिवाय, न्यायालय पोटगी आणि निवृत्ती लाभ यासारख्या बाबींचा देखील विचार करते. कायदेशीरदृष्ट्या, भारतात घटस्फोट हिंदू विवाह कायदा १९५४ अंतर्गत न्यायालयात होतो. ग्रे घटस्फोटाच्या प्रकरणांमध्ये, न्यायालय पोटगी ठरवताना लग्नाचा कालावधी, जोडीदाराचे वय आणि आरोग्य आणि त्यांची आर्थिक स्थिती यासारख्या घटकांचा विचार करते.
कोणत्या सेलिब्रिटींनी घेतला ग्रे-डिव्हॉर्स
आपण कमल हासनच्या ग्रे घटस्फोटाबद्दल आधीच चर्चा केली आहे. वीरेंद्र सेहवाग क्लबमध्ये सामील होण्याच्या अफवा येण्यापूर्वी, चित्रपट निर्माते प्रकाश झा आणि दीप्ती नवल देखील १७ वर्षांच्या लग्नानंतर वेगळे झाले होते. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचे नातेही १९ वर्षे टिकले, त्यानंतर दोघांनीही कायदेशीर घटस्फोट घेतला. त्याच धर्तीवर, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनीही बराच काळ लग्न केल्यानंतर त्यांच्या पत्नीपासून घटस्फोट घेतला.