फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथा कसोटी सामना : ५ सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील चौथा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. या सामन्याचा आज तिसरा दिवस झाला यामध्ये भारताच्या फलंदाजांनी कमाल केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये ४७४ धावा केल्या आहेत, आता तिसऱ्या दिवसअखेर भारताच्या संघाने ९ विकेट गमावून ३५८ धावा केल्या होत्या. नितीश रेड्डी कारकिर्दीतील पहिले शतक झळकावल्यानंतर नाबाद आहे आणि क्रिझवर १०५ धावा करून अजूनही टिकून आहे, त्याला मोहम्मद सिराज साथ देत आहे. त्याचबरोबर वॉशिंग्टन सुंदरने देखील अर्धशतक झळकावले. १६२ चेंडूंमध्ये ५० धावा करून सुंदरने विकेट गमावली.
नितीश कुमार रेड्डीच्या शतकाच्या जोरावरच भारताला फॉलोऑन पुढे ढकलून ही धावसंख्या गाठता आली. या अष्टपैलू खेळाडूने पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्येही आपल्या बॅटने अप्रतिम कामगिरी दाखवली, पण त्याला मोठी खेळी खेळता आली नाही, मात्र त्याने हे काम मेलबर्नमध्ये पूर्ण केले. एमसीजी चाचणीदरम्यान नितीश कुमार रेड्डी यांची फिल्मी शैलीही पाहायला मिळाली. अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने पुष्पा स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहेत. तर त्याने शतक झळकावल्यानंतर खास सेलिब्रेशन केले आहे आता त्याचे हे सेलिब्रेशनचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
नितीश रेड्डीने आतापर्यंत १०५ धावांच्या खेळीत १० चौकार आणि १ गगनचुंबी षटकार मारला आहे. नितीश यांच्या पहिल्या शतकाबद्दल पुष्पा मुव्हीच्या सोशल मीडिया अकाउंटवरूनही अभिनंदनाचा वर्षाव झाला. बीसीसीआयने नितीशच्या शतकावर लिहिले की, “फायर नहीं वाइल्डफायर है.” यावर पुष्पा मूव्हीच्या खात्यावर टिप्पणी केली आहे, “हे खरंच एक वाइल्डफायर इनिंग आहे.” तुझ्या पहिल्या कसोटी शतकाबद्दल अभिनंदन.
फायर नहीं वाइल्डफायर है! 🔥🔥
Nitish Kumar Reddy gets to his maiden CENTURY and what a stage to get it on!
He is now the leading run scorer for India in the ongoing BGT 🙌👏#TeamIndia #AUSvIND https://t.co/URu6dBsWmg pic.twitter.com/J8D08SOceT
— BCCI (@BCCI) December 28, 2024
नितीश कुमार रेड्डीने सोशल मीडियावर सामना झाल्यानंतर एक इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे की, “I also believe in Siraj Bhai” त्यानंतर त्याने एक हार्ट इमोजी आणि हसण्याचा इमोजी टाकला आहे.
या स्टोरी मागचं कारण सांगायचं झालं तर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याचा T२० विश्वचषकामधील एक मुलाखत दिली होती. यामध्ये त्याने सांगितले होते की, “I also believe in jassi bhai” असे तो म्हणाला होता. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत होता त्याचे अनेक मिम्स देखील सोशल मीडियावर बनवण्यात आले होते.