नेमकं काय म्हणाले आगरकर?
२०२७ च्या विश्वचषकात चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीला पहायला आवडणार का? असा प्रश्न जेव्हा विचारण्यात आला तेव्हा अजित आगरकर यांनी उत्तर देत म्हटले की, “बघा, ते सध्या संघाचा भाग असून मी म्हटल्याप्रमाणे, ते बऱ्याच काळापासून उत्कृष्ट खेळाडू राहिले आहेत. पण वैयक्तिक खेळाडूंबद्दल बोलण्याचे हे व्यासपीठ नाही. कारण, तुम्हाला संघावर आणि ते काय साध्य करू शकते यावर लक्ष केंद्रित करावे लागते. विश्वचषक दोन वर्षे दूर आहे, आणि तेव्हा परिस्थिती नेमकी काय असेल हे आम्हाला अद्याप माहित नाही. मी असे म्हणू शकतो की एक तरुण खेळाडू येण्याची शक्यता आहे.”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून प्रत्येक मालिकेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा आढावा घेण्यात येईल असे देखील अनेक भारतीय दिग्गजांकडून मत व्यक्त करण्यात आले आहे. जेव्हा अजित आगरकर यांना विचारण्यात आले की हे दोन्ही खेळाडू २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषक संघाचा भाग असणार का? की नाही? तेव्हा अजित आगरकर म्हणाले की, “एकाची सरासरी ५० असून दुसऱ्याची सरासरी ५० च्या जवळपास पोहचते. आम्ही त्यांना प्रत्येक सामन्यात चाचण्यांसाठी ठेवणार नसलो तरी पण २०२७ अजून देखील खूप दूर आहे. दोघेही आता एकाच फॉरमॅटमध्ये सक्रिय आहेत. ते खूप दिवसांनी खेळणार आहेत. त्यांनी त्यांचा शेवटचा एकदिवसीय सामना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता आणि त्यानंतर सात महिन्यांनी ते आता खेळत आहेत.”
अजित आगरकर पुढे बोलेल की, “एकदा ते खेळायला लागला की, तुम्ही त्याचे मूल्यांकन करा. ते चाचणीसाठी नाही, कारण नाही. त्यांनी काही साध्य करायचे होते ते सर्व साध्य केलेले आहे, फक्त ट्रॉफीच नाही तर धावा देखील. असे नाही की जर त्यांना या मालिकेत धावा केल्या नाहीत तर ते २०२७ च्या विश्वचषकात नसणार. पण जर त्यांनी ३०० धावा केल्या तर तो विश्वचषक संघाचा भाग असणार आहे.”






