विराट कोहली (फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : ४० वर्षीय फलंदाजाचा मोठा कारनामा! रणजी ट्रॉफीमध्ये उडवली खळबळ; रचला ३२ शतकांचा डोंगर
विराट कोहली रचणार विश्वविक्रम
विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचे ५२ वे शतक झळकावण्यासाठी कोहलीला एका शतकाची आवश्यकता आहे. २०२३ च्या न्यूझीलंडविरुद्धच्या विश्वचषक उपांत्य सामन्यामध्ये कोहली सचिन तेंडुलकरचा विक्रम (४९) पिछाडीवर टाकत या स्वरूपात ५० शतके झळकावणारा पहिला फलंदाज बनला होता. आता, जर कोहलीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आणखी एक शतक ठोकले तर तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून काढेल आणि सर्वाधिक शतके करणारा खेळाडू बनणार आहे. सध्या, दोन्ही भारतीय दिग्गज कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रत्येकी ५१ शतकांसह बरोबरीत आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सर्वांच्या नजरा रोहित आणि कोहली यांच्यावर असणार आहेत. जे फेब्रुवारी-मार्चमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान भारताकडून शेवटचे खेळलेले होते आणि आता ते फक्त ५० षटकांच्या स्वरूपातचे खेळणार आहेत. दोन्ही माजी भारतीय कर्णधारांनी नेटमध्ये सुमारे ३० मिनिटे फलंदाजीचा सराव केला. २९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांच्या तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामन्यांच्या दौऱ्यासाठी भारतीय संघ बुधवार आणि गुरुवारी दोन गटात येथे दाखल झाला आहे. नेटमध्ये सराव सत्रात वेळ घालवल्यानंतर रोहित मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी दीर्घ चर्चा करताना देखील दिसून आला.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा आणि ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)






