फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होणार आहे. ही मालिका सुरु व्हायला काही तास शिल्लक राहिले आहेत. १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा एक मोठा धक्का आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खेळाडूच्या दुखापतीची घोषणा केली आणि त्याच्या जागी खेळाडूचीही घोषणा केली.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना १९ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल, तर दुसरा आणि तिसरा सामना २३ आणि २५ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर टी-२० मालिका खेळवली जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले आहे की स्टार अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सहभागी होणार नाही. त्याला कमी दर्जाची दुखापत झाली आहे.
तथापि, ऑस्ट्रेलिया त्याच्यासोबत कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही, कारण अॅशेस मालिका त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाची आहे. म्हणूनच, खबरदारी म्हणून, अॅशेससाठी सज्ज राहण्यासाठी कॅमेरॉन ग्रीनला वगळण्यात आले आहे. तथापि, तो २८ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या शेफील्ड शिल्डमध्ये खेळेल. “ग्रीनला थोड्या काळासाठी पुनर्वसन करावे लागेल आणि शेफील्ड शिल्डच्या तिसऱ्या फेरीत त्याच्या प्रगतीचे मूल्यांकन केले जाईल,” असे सीएने एका निवेदनात म्हटले आहे.
Australia face another setback as Cameron Green is ruled out of the ODI series against India due to a side injury. Marnus Labuschagne has been named as his replacement pic.twitter.com/VZrDz1yfZH — CRICKETNMORE (@cricketnmore) October 17, 2025
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ग्रीनच्या जागी मार्नस लाबुशेनची निवड केली आहे. त्याने अलिकडेच त्याच्या शेवटच्या पाच घरच्या सामन्यांपैकी चार सामन्यांमध्ये शतके ठोकली आहेत, त्यापैकी दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये होते. भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडणारा ग्रीन हा तिसरा खेळाडू आहे. जोश इंग्लिस आणि अॅडम झांपा यांनाही दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले आहे.