फोटो सौजन्य – England's Barmy Army
भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्याचा आज तिसरा दिवस असणार आहे. शुभमन गिल नेतृत्वाखाली भारताच्या संघाने पहिल्या डावांमध्ये 471 धावा केल्या आहेत, तर दुसऱ्या दिनी दुसऱ्या गावामध्ये इंग्लंडच्या संघाने आतापर्यंत तीन विकेट गमावून 209 केल्या आहेत. भारतीय संघासाठी जसप्रीत बुमरा याने संघाचे तीन विकेट घेतले त्या व्यतिरिक्त कोणत्याही गोलंदाजीच्या हाती विकेट लागली नाही. कालच्या दिवशी सामना दरम्यान लंच ब्रेकनंतर पावसाने हजेरी लावली होती पण तो काही का कोसळला आणि त्यानंतर सामना पुन्हा सुरू करण्यात आला होता. भारताचे संघाला आज विकेट्स मिळवणे फार गरजेचे आहे त्याआधी आजचे लीड्स से हवामान कसे असणार आहे यासंदर्भात जाणून घ्या.
दुसऱ्या दिवशी संघाने ४१ धावांच्या आत ७ विकेट गमावल्या. उर्वरित दिवस इंग्लंडच्या फलंदाजांनी तसेच भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने वर्चस्व गाजवले. सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही पाऊस पडला. अशा परिस्थितीत, चाहत्यांच्या मनात तिसऱ्या दिवशी हवामान कसे असेल असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
SL vs BAN सामन्यात WTC पाॅइंट टेबलचे खाते उघडले! नजमुल हुसेन शांतोचे सलग दुसरे शतक, पण सामना…
AccuWeather च्या अहवालानुसार, रविवारी लीड्समधील हवामान आल्हाददायक असेल. दिवसाचे कमाल तापमान २१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १२ अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे. सकाळी हलका सूर्यप्रकाश असेल, परंतु हवामान हळूहळू बदलेल. स्थानिक वेळेनुसार दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय वेळेनुसार, लीड्समध्ये संध्याकाळी ७ ते ८ वाजेदरम्यान पाऊस पडू शकतो. अशा परिस्थितीत दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्राच्या खेळावर परिणाम होऊ शकतो. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी संध्याकाळी पाऊस पडण्याची ५० टक्के शक्यता आहे. अशा परिस्थितीत सामना थांबवावा लागू शकतो. हा पाऊस भारतीय वेगवान गोलंदाजांसाठीही उपयुक्त ठरू शकतो.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडचा पहिला डाव ३ विकेटच्या मोबदल्यात २०९ धावा झाला आहे. ऑली पोपने १०० धावा केल्या आहेत तर हॅरी ब्रूकचा खातंही उघडलेला नाही. इंग्लंडची पहिल्या डावात सुरुवात खराब झाली होती आणि पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने जॅक क्रॉलीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
क्रॉलीला फक्त ४ धावा करता आल्या. त्यानंतर पोप आणि बेन डकेटने १२२ धावा जोडल्या, ही भागीदारीही बुमराहने मोडली. त्याने ६२ धावांवर डकेटला बाद केले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत बुमराहने जो रूटला आपल्या जाळ्यात अडकवले. रूटला फक्त २८ धावा करता आल्या.