ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पाद्यपूजन सोहळ्याने निवडणूक कचेरीचे अनोखे उद्घाटन
ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान हाच पक्षाचा कणा
भाजपचे अधिकृत उमेदवार राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “निवडणूक ही केवळ राजकीय लढाई नसते, तर ती संघटनेचा आत्मा असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान जपण्याची संधी असते. आज भाजप ज्या उंचीवर आहे, त्यामागे या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे अनेक वर्षांचे कष्ट आणि त्याग आहे. त्यांचा आशीर्वाद घेऊनच आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत.”
असा रंगला उद्घाटन सोहळा
प्रभाग २५ मधील या अनोख्या सोहळ्यात ज्येष्ठ नगरसेविका मीराताई पावगी, ज्योत्स्नाताई सरदेशपांडे, ज्येष्ठ कार्यकर्ते रमेशजी परचुरे आणि किरणजी सरदेशपांडे यांच्या हस्ते निवडणूक कचेरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या हृद्य सोहळ्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
हे देखील वाचा: नांदेडमध्ये राजकीय हालचालींना वेग; खासदार रवींद्र चव्हाण यांनी लावली जोरदार फिल्डींग
प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या प्रसंगी कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंतभाऊ रासने यांनी भेट देऊन उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यास प्रभाग २५ मधील महायुतीचे उमेदवार:
राघवेंद्र बाप्पु मानकर
स्वरदा बापट
कुणाल टिळक
स्वप्नाली पंडित यांच्यासह माजी नगरसेवक दिलीप काळोखे, राजेश येनपुरे, गायत्री खडके, उदय लेले तसेच अमित कंक, मनोज खत्री, निलेश कदम, किरण जगदाळे, संतोष फडतरे, प्रणव गंजीवाले, मोहना गद्रे, रुपाली कदम, सुनील रसाळ आणि श्रेयस लेले यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.






