(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“बिग बॉस १९” चा विजेता गौरव खन्ना आता स्वतःचा यूट्यूब चॅनल चालवत आहे आणि दररोज तिथे व्हिडिओ अपलोड करतो. त्याला हा शो जिंकून एक महिना झाला आहे. त्याच्या नवीनतम व्हीलॉगमध्ये, त्याने खुलासा केला की त्याला अद्याप एका टास्क दरम्यान जिंकलेली कार मिळालेली नाही.
गौरव खन्ना याने त्याच्या नवीन व्हीलॉगमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या तयारीची झलक दाखवली. याबद्दल तो म्हणाला, ”मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं होस्टिंग करत आहे. हा अनुभव खूप वेगळा आहे. स्क्रिप्ट इतकी मोठी आहे की, जणू परिक्षेची तयारी करतोय असं वाटत आहे. मी घोड्यावर बसून स्टेजवर एन्ट्री घेणार आहे. दोन शओ होणार असून प्रत्येक शोला सुमारे 40 हजार प्रेक्षक असतील. हा रिलायन्स फॅमिली शो जो दरवर्षी धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केला जातो. तो पुढे म्हणतो, ही संधी मिळाल्याबद्दल मी स्वत:ला खूप नशीबवान समजोत. आधीही मला यासाठी विचारण्यात आले होते,पण तेव्हा जमलं नाही. यंदा जुळून आलं”
नंतर व्लॉगमध्ये,तो प्रणीत मोरेसोबत जेवताना दिसतो. या दरम्यान, तो त्याच्या रिअॅलिटी शोच्या दिवसांची आठवण देखील करून देतो. यावेळी त्यांच्यात बिग बॉस बद्दलच्या गप्पा रंगतात. नंतर प्रणितला निरोप देताना गौरव त्याला मिठाई भेट देतो, तेव्हा प्रणित विनोदाने म्हणतो, “मला तुमची गाडी भेट म्हणून द्या.”यावर गौरव हसत म्हणतो, ती कार अजून मलाच मिळालेली नाही.”
गौरव खन्नाने शोमधील सर्व टास्कमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आणि अनेक टास्क जिंकले. त्यापैकी एक टास्क कारचा होता, जो त्याने जिंकला. एका महिन्याहून अधिक काळ लोटला आहे आणि तो अजूनही त्या भेटवस्तूची वाट पाहत आहे.






