फोटो सौजन्य : X
भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स तिसऱ्या दिनाचा अहवाल : भारत अ विरुद्ध इंग्लंड लायन्स यांच्यामध्ये सध्या दुसरा कसोटी सामना सुरू आहे. काल म्हणजेच 6 जून रोजी या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस पार पडला. या तिसऱ्या दिनी भारताचे संघाने इंग्लंडला यांचा 327 धावांवर रोखलं. पहिल्या डावामध्ये भारताच्या संघाने फलंदाजी करत 348 धावा केल्या होत्या. कालच्या सामन्याचा हिरो हा वेगवान गोलंदाज खलील अहमद ठरला. त्याने त्याच्या चार ओव्हरमध्ये चार विकेट्स नावावर केले आहेत.
तिसरा दिनी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी राहिली यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर खलील अहमद याने संघाला चार विकेट्स मिळवून दिले. त्याने तिसऱ्या दिनी जॉर्डन मॅथ्यू, जेम्स रिव्ह, जॉर्ज हिल आणि क्रिस वोक्स या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. अंशुल कंबोज याने संघासाठी दोन विकेट्स घेतले. दुसऱ्या सामन्यांमध्ये तुषार देशपांडेला देखील संधी मिळाले आहेत आणि ही संघाला दोन विकेटची कमाई करून दिली. तनुष कोटीयान आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.
तिसऱ्या डावाच्या समाप्तीनंतर भारताचा संघ सध्या फलंदाजी करत आहे. यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या डावामध्ये 348 धावा केल्या आहेत. दुसऱ्या डावामध्ये भारताच्या संघाने तिसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर ४ विकेट्स गमावुन 163 धावा केल्या आहेत. या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणखी एकदा फेल ठरला. त्याने फक्त 5 धावा केल्या आणि विकेट गमावली. तर केएल राहुल याने आणखी एक अर्धशतक झळकावले. त्याने 51 धावांची खेळी खेळली, यामध्ये त्याने 9 चौकार मारले.
अभिमन्यु ईश्वरन याने दुसऱ्या डावामध्ये कमालीची कामगिरी केली त्याने पहिल्या डावामध्ये विशेष कामगिरी करु शकला नाही पण तो या डावामध्ये त्याने 80 धावांची खेळी खेळली. यामध्ये त्याने 10 चौकार मारले. भारतीय संघासाठी ८ वर्षानंतर पुनरागमन करणारा करुण नायर या डावामध्ये लवकर बाद झाला. त्याने फक्त १५ धावा केल्या.
भारतीय संघासाठी तिसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर ध्रुव जुरेल आणि नितिश कुमार रेड्डी हे दोघे फलंदाजी करत आहेत. यामध्ये ध्रुव जुरेल याने 6 धावा केल्या आहेत तर नितिश कुमार रेड्डी १ धाव केली आहेत. आज हे दोघे भारतीय संघासाठी सुरुवात करतील.