फोटो सौजन्य – BCCI
भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचा अहवाल : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामधील मालिकेच्या पहिल्या सामन्याचा आज चौथा दिवस काही तासांमध्ये सुरू होणार आहे. त्याआधी तिसऱ्या दिनी खेळ कसा राहिला या संदर्भात आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पाच विकेट्स पहिल्याच सामन्यात नावावर केले. तिसऱ्या दिनी भारताचे संघाने इंग्लंडचे संघाला 465 धावांवर रोखले. यामध्ये हरी ब्रूकने 99 धावांची खेळी खेळली. एक धावेमुळे त्याची शतक हुकले. हॅरी ब्रुकच्या खेळीने इंग्लंडच्या संघाला मोठी धावसंख्या उभारता आली त्याचबरोबर व्होक्स, बेन स्टोक्स यांनी लहान खेळी खेळल्या पण त्या प्रभावशाली खेळी खेळल्या. सुरू असलेल्या सामन्यात दोन्ही संघांची कामगिरी कशी राहिली या संदर्भात सविस्तर वाचा.
भारताच्या संघाने 465 धावांवर इंग्लंडच्या संघाला रोखले. यामध्ये ऑलि पोपला प्रसिद्ध कृष्णाने बाहेरचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर बेन स्टोक याला देखील मोठी खेळी खेळण्यापासून रोखले. दुसऱ्या दिनी इंग्लंडच्या संघाने तीन विकेट कमावले होते त्यानंतर तिसरा दिनी इंग्लंडच्या संघाने सातही विकेट्स कमावली सध्या भारताचा संघ फलंदाजी करत आहे. हॅरी ब्रुक याने संघासाठी 99 धावांची खेळी खेळली यात त्याने 11 चौकार आणि दोन षटकार मारले. जेमी स्मिथ याने 40 धावा केल्या यात त्याने पाच चौकार आणि एक षटकार मारला. अनुभवी गोलंदाज आणि फलंदाज क्रिस वोक्स याने देखील 38 धावांची खेळी खेळली.
भारतीय संघाचे गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर जसप्रीत बुमरा याने पाच विकेट्स नावावर केले. त्याने जो रूट, जॅक क्रोली, बेन डकेट, क्रिस वोक्स आणि टंग यांना बाहेरचा रस्ता दाखवला. प्रसिद्ध कृष्णाच्या हाती तीन विकेट्स लागले तर मोहम्मद सिराज याने देखील दोन विकेट्स घेतले. रवींद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूर या दोघांच्या हाती एकही विकेट लागली नाही. प्रसिद्ध कृष्णा याने शतक झळकावणारा ओली पॉप, हॅरी ब्रुक आणि जेमी स्मिथ यांना आउट केले तर मोहम्मद सिराज याने बेन स्टोक्स आणि कार्स याला बाहेरचा रस्ता दाखवला.
Stumps on Day 3 in Headingley 🏟️#TeamIndia move to 90/2 in the 2nd innings, lead by 96 runs.
KL Rahul (47*) and Captain Shubman Gill (6*) at the crease 🤜🤛
Scorecard ▶️ https://t.co/CuzAEnBkyu#ENGvIND pic.twitter.com/JSlTZeG4LR
— BCCI (@BCCI) June 22, 2025
तिसरा डावाच्या फलंदाजीला सुरुवात झाली आहे यामध्ये भारताचा संघ सध्या फलंदाजी करत आहे टीम इंडियाने तिसऱ्या दिनाच्या समाप्तीनंतर तिसऱ्या डावांमध्ये दोन विकेट गमावून 90 धावा केल्या आहेत आणि 96 धावांची आघाडी घेतली आहे. यामध्ये सध्या के एल राहुल आणि कर्णधार शुभमन गिल हे दोघे फलंदाजी करत आहेत. मागील गावामध्ये शतक झळकावणारे यशस्वी जयस्वाल यावेळी स्वस्तात बाद झाला तर साई सुदर्शन हा त्याच्या पदार्पण सामन्यात खेळत आहे तो पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला होता तर या सामन्यात तो 30 धावा करून पुन्हा बेन स्टोक्स यांनी त्याला शिकार बनवले.