फोटो सौजन्य – X
हेडिंग्ले येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल आज जाहीर होणार आहे. भारताच्या युवा खेळाडूंना या सामन्यात विजय मिळवणे फार गरजेचे आहे. टीम इंडियाने दिलेल्या ३७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इंग्लंड करू शकेल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खेळाच्या चौथ्या दिवशी केएल राहुल आणि ऋषभ पंत यांच्या शानदार शतकांच्या मदतीने टीम इंडियाची स्थिती मजबूत झाली.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान यजमान संघासाठी आनंदाची बातमी आली आहे. जोफ्रा आर्चर इंग्लंड संघात प्रवेश करणार आहे. तो भारताविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यास सज्ज आहे. दुखापतीमुळे आर्चर पहिल्या सामन्यात सहभागी होऊ शकला नाही. पण आता त्याच्या पुनरागमनाची बातमी समोर आली आहे.
एक्सप्रेस स्पोर्ट्सच्या माहितीनुसार, इंग्लडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना खेळण्यास सज्ज आहे. तथापि, बोर्ड त्याला दुसऱ्या सामन्यासाठी खेळवते की नाही हे येणारा काळच सांगेल. पण जर आर्चर परतला तर टीम इंडियाचा ताण वाढणार आहे.
आर्चर हा असा गोलंदाज आहे ज्याच्याकडे कसोटी स्वरूपात कोणत्याही फलंदाजाला शरणागती पत्करण्याची ताकद आहे. जर तो इंग्लंडच्या संघात सामील झाला तर संघाचे मनोबल वाढेल आणि वेगवान गोलंदाजी विभाग अधिक मजबूत होईल. आर्चर त्याच्या वेगवान गोलंदाजीने भारतीय फलंदाजांना खूप त्रास देऊ शकतो.
🚨 JOFRA ARCHER IS COMING 🚨
– Jofra Archer is now fully fit and he’s ready for the Test series against India. (Express Sports). pic.twitter.com/gxzIgOP3Oa
— Tanuj (@ImTanujSingh) June 24, 2025
दुखापतीमुळे आर्चरने आतापर्यंत इंग्लंडसाठी जास्त कसोटी सामने खेळलेले नाहीत. त्याने आतापर्यंत फक्त १३ कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. या काळात आर्चरने ४२ बळी घेतले आहेत. त्याने ३१.०४ च्या सरासरीने आणि २.९९ च्या इकॉनॉमी रेटने धावा दिल्या आहेत.
भारत विरुद्ध इंग्लड यांच्यामध्ये पाच सामन्याच्या कसोटी मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेचा पहिला सामना आज संपणार आहे, तर दुसरा सामना हा 2 जूलै रोजी खेळवला जाणार आहे. भारताचा संघाचे कर्णधारपद हे रोहित शर्माच्या निवृतीनंतर आता शुभमन गिल संघाची कमान सांभाळत आहे. आता या मालिकेमध्ये भारताचा युवा संघ खेळत आहे आणि पहिल्याच सामन्यात भारताच्या फलंदाजांनी ५ शतक झळकावले.