जसप्रीत बूमराह(फोटो-सोशल मिडिया)
IND Vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्स येथे खेळवण्यात आला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा ५ विकेट्सने पराभव केला. तर आता दुसरा सामना बर्मिंगहॅम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी भारतासाठी वाईट बातमी समोर आली आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याची माहिती पुढे आली आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पाच बळी घेतल्यानंतर, दुसऱ्या डावात त्याला एकही बळी घेता आला नाही. जसप्रीत बुमराह आता या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात खेळताना दिसणार आहे.
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, वर्कलोड मॅनेजमेंटमुळे जसप्रीत बुमराह दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात आले आहे की, उपलब्ध माहितीनुसार, बुमराह बर्मिंगहॅममध्ये मैदानात उतरणार नाही, परंतु इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना खेळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. जो १० ते १४ जुलै दरम्यान लंडनमधील लॉर्ड्स येथे खेळला जाणार आहे.
हेही वाचा : क्रिकेटर ते बेसिक एज्युकेशन ऑफिसर! Rinku Singh ने केली नवी इनिंग सुरू; किती मिळणार पगार?
बुमराहच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीपला दुसऱ्या कसोटी सामन्यात प्लेइंग-११ मध्ये समाविष्ट करण्यात येऊ शकते. अर्शदीपला बर्मिंगहॅममध्ये कसोटी पदार्पण संधी मिळू शकते. २०२४ मध्ये आयसीसी टी२० क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारा अर्शदीपने यापूर्वी कधीही भारतासाठी कसोटी सामना सामना खेळलेला नाही. जर त्याला खेळण्याची संधी देण्यात आली तर तो त्याचा पहिलाच कसोटी सामना असणार आहे.
सतेच, दुसऱ्या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या जागी नितीश रेड्डीला प्लेइंग ११ मध्ये समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटीत शार्दुल बॅटने फारसे करता आले नाही. त्याच वेळी, तो पहिल्या डावात फक्त ६ षटके टाकली होती. त्यानंतर, त्याने दुसऱ्या डावात दोन विकेट्स घेतल्या, परंतु त्या ते प्रभावित करण्यासाठी पुरेशा ठरल्या नाहीत.
हेही वाचा : IND Vs ENG : टिम इंडियाच्या अडचणीत वाढ! इंग्लंडचा ‘हा’ घातक खेळाडू ४ वर्षांनी परतला संघात
भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतमगंभीरने पत्रकारांना सांगितले की, “मला वाटते की त्याच्या कामाचे व्यवस्थापन करणे आपल्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे, कारण पुढे खूप क्रिकेट खेळायचे आहे आणि तो काय घेऊन येतो हे आपल्याला माहिती आहे. म्हणूनच, दौऱ्यावर येण्यापूर्वीच तो तीन कसोटी सामने खेळेल असे ठरवण्यात आले होते. पण त्याचे शरीर कसे आहे? ही पहावे लागणार आहे.”