ओव्हल येथील मैदानावर पावसाचा व्यत्यय(फोटो-bcci)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ओव्हल येथे खेळला जात आहे. सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार ऑली पोपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारत प्रथम फलंदाजी करत आहे. या सामन्यादरम्यान पावसाचा लपंडाव सुरु आहे. दोन वेळा खेळ थांबवण्यात आला. भारताने ३ विकेट्स गमावून ८७ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून गस अॅटकिन्सनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या आहेत.
इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर भारत प्रथम फलंदाजी करत आहे. भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी डावाची सुरवात केली. भारताची सुरवात फारशी चांगली झाली नाही. भारताच्या स्कोर बोर्डवर १० धावा लागलेल्या असताना जैस्वाल बाद झाला. त्याला गस अॅटकिन्सन एलबीडब्ल्यू पकडून बाद केले. जैस्वाल ९ चेंडूचा सामना करत २ धावा करून माघारी गेला. त्यांनतर तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शन मैदानात आला. साई आणि केएल राहुल यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु या दरम्यान केएल राहुल वोक्सच्या चेंडूवर कट करण्याच्या नादात स्वतःची विकेट देऊन बसला. केएल राहुलने ४० चेंडूचा सामना करत १४ धावा केल्या.
राहुलची विकेट गेल्याने भारत बॅकी फुटवर आला. कारण गेल्या चार कसोटी सामन्यात तो खोऱ्याने धावा काढत आहे आणि इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबदबा राखत आहे. राहुलनंतर चौथ्या क्रमांकावर भारताचा कर्णधार शुभमन गिल फलंदाजीसाठी मैदानात आला. साई सुदर्शन आणि गिल यांची जोडी चांगली जमली होती. दोन्ही फलंदाज आत्मविश्वासाने खेळताना दिसत होते. परंतु, या दरम्यान शुभमन गिलने स्वतःचा आत्मघात करून घेतला. त्याने अॅटकिन्सनने टाकलेला चेंडू टोलवला आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये गिल पूर्णतः फसला आणि तेवढ्यात अॅटकिन्सन चेंडू यष्टीवर मारून फेकला. यामध्ये गिलला धावबाद होऊन माघारी जावे लागले.
त्यामुळे भारताची स्थिती ८३ वर ३ अशी झाली होती. गिलनंतर गेल्या सामन्यातून वगळण्यात आल्या आणि या सामन्यात पुन्हा संघात स्थान मिळालेला करून नायर फलंदाजीसाठी आला. परंतु, तेवढ्यात पुन्हा पावसाने व्यत्यय आणला. आता साई सुदर्शन ८४ चेंडू २८ धावा आणि नायर ८ चेंडू ० धावांवर नाबाद आहेत. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला असून आता ती ब्रेक देण्यात आला आहे. इंग्लंडकडून गस अॅटकिन्सनने २, तर ख्रिस वोक्सने १ विकेट घेतली आहे
हेही वाचा : PHOTOS : केएल राहुलसह ‘या’ ५ भारतीय फलंदाजांनी गाजवले आहे ओव्हलचे मैदान; काढल्या खोऱ्याने धावा
भारत प्लेइंग ११
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), करुण नायर, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग ११
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (यष्टिरक्षक), ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग.