योगराज सिंग आणि शुभमन गिल(फोटो-सोशल मिडिया)
Yograj Singh’s commentary on Shubman Gill : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दूसरा सामना बर्मिंगहॅममध्ये सुरू असून या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने सर्वोत्तम खेळी साकारली आहे. गिलने ३८७ चेंडूत २६९ धावा केल्या आहेत, या खेळीत ३० चौकार आणि ३ षटकारांची बरसात केली आहे. यासह त्याने अनेक विक्रम देखील आपल्या नावावर केले आहेत. गिलच्या या कामगिरीनंतरही माजी भारतीय क्रिकेटपटू योगराज सिंग नाराज खूश नसल्याचे समोर आले आहे. योगराज सिंग यांनी गिलकडून जास्त अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. योगराज सिंग म्हणाले की, गिलने गुन्हा केला आहे. याशिवाय, योगराज सिंगने भारतीय कर्णधाराच्या या खेळीचे श्रेय त्याचा मुलगा युवराज सिंगला दिले आहे.
भारतीय माजी क्रिकेटपटू आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग शुभमन गिलच्या द्विशतकावर खुश नाहीत. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी म्हटले आहे की, “जर वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा कसोटी सामन्यात ४०० किंवा ५०० धावा करू शकतो तर आपण ते का करू शकत नाही?” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
हेही वाचा : IND vs ENG : एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडचा बोलबाला! शतक ठोकून Harry Brook कडून लीड्सची वसूली
योगराज सिंग पुढे म्हणाले की, “शुभमन गिलच्या यशामागे युवराज सिंगचा मोठा हात आहे.” त्यांनी असे देखील म्हटले आहे की, युवराज सिंग आणि गौतम गंभीर यांच्याकडून लोकांनी शिकले पाहिजे की कोचिंग कशा प्रकारे केले जाते. त्यांनी पुढे सांगितले की युवराज सिंगकडून स्वतः गिलला कोचिंग देण्यात आले आहेत. शुभमन गिल हा एक उत्तम खेळाडू असल्याचे देखील म्हटले आहे. त्यांनी सांगितले की गिलने आपला डाव जास्त वेळ पुढे घ्यायला हवा होता. त्याने निश्चितच त्रिशतक करायला पाहिजे होते.
#WATCH | #INDvENG | Chandigarh | Indian Captain Shubman Gill hits a double century | Former Indian Cricket Yograj Singh says, “…Yuvraj Singh personally coached Shubman Gill…Shubman Gill is a great player…One should learn from Yuvraj Singh and Gautam Gambhir about how to… pic.twitter.com/jIVFvu1BNC
— ANI (@ANI) July 3, 2025
टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत २६९ धावांची अप्रतिम अशी खेळी केली आहे. या दरम्यान त्याने अनेक विक्रम देखील नोंदवले आहेत. तो सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई खेळाडू बनला आहे. याशिवाय, भारतीय कर्णधार म्हणून गिलने कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा विक्रम केलाया आहे.
हेही वाचा : IND Vs ENG : लॉर्ड्स कसोटीपूर्वी भारताची डोकेदुखी वाढणार! ‘हे’ तेजतर्रार गोलंदाज इंग्लंडच्या ताफ्यात परतणार