फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला एकदिवसीय सामना : इंग्लंडविरुद्धच्या नागपूर एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे टीम इंडियाने हा सामना ४ विकेट्सने जिंकण्यात यश मिळवले. यामध्ये भारताच्या संघासाठी पहिला एकदिवसीय सामना खेळणार हर्षित राणा याने कमालीची गोलदांजी करून ३ फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. कालच्या सामन्यांमध्ये २४९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना शुभमन गिल, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी शानदार अर्धशतके झळकावली. या तिघांच्या स्फोटक खेळींमुळे भारतीय मधली फळी पूर्वीसारखीच मजबूत दिसत होती.
शुभमन गिलला त्याच्या ८७ धावांच्या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. श्रेयस अय्यरने ३६ चेंडूत ९ चौकार आणि २ गगनचुंबी षटकारांसह ५९ धावा केल्या, तर अक्षर पटेलने ४७ चेंडूत ५२ धावा केल्या. या तिगडीने टीम इंडियाला मालिकेचा पहिला विजय मिळवून दिला आणि मालिकेमध्ये भारताच्या संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे.
1⃣0⃣0⃣-run stand ✅
Shubman Gill 🤝 Axar Patel
Follow The Match ▶️ https://t.co/lWBc7oPRcd#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZCvPtEpqqa
— BCCI (@BCCI) February 6, 2025
या खेळींच्या जोरावर, गिल, अय्यर आणि अक्षर यांनी १५ वर्षांपासून कोरड्या पडलेल्या विक्रमांच्या यादीत आपले स्थान निर्माण केले. धावांचा पाठलाग करताना ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या भारताच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजांची ही यादी आहे. या यादीत शेवटचे विराट कोहली , युवराज सिंग आणि सुरेश रैना यांची नावे २०१० मध्ये नोंदली गेली होती. भारतीय एकदिवसीय इतिहासातील ही चौथी घटना आहे जेव्हा भारताच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी धावांचा पाठलाग करताना ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
१९९० मध्ये इंग्लंडविरुद्ध संजय मांजरेकर, डी. वेंगसरकर आणि अझरुद्दीन या त्रिकुटाने पहिल्यांदा ही कामगिरी केली होती, तर एका वर्षानंतर १९९१ मध्ये संजय मांजरेकर, सचिन तेंडुलकर आणि मोहम्मद अझरुद्दीन यांनी श्रीलंकेविरुद्ध ही कामगिरी करण्यात यश मिळवले.
१९९० मध्ये इंग्लंड विरुद्ध
संजय मांजरेकर/डी. वेंगसरकर/अझरुद्दीन
१९९१ मध्ये श्रीलंका विरुद्ध
संजय मांजरेकर/सचिन तेंडुलकर/अझरुद्दीन
२०१० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध
विराट कोहली/युवराज सिंग/सुरेश रैना
२०२५ मध्ये इंग्लंड विरुद्ध*
शुभमन गिल/श्रेयस अय्यर/अक्षर पटेल
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिल साल्ट आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी करत त्यांना चांगली सुरुवात करून दिली. तथापि, पहिली विकेट पडल्यानंतर, संघ डगमगला आणि पुढच्या दोन धावांत आणखी दोन विकेट गमावल्या. जोस बटलर आणि जेकब बेथेल यांनी त्यांच्या अर्धशतकांसह डाव सावरला, परंतु तरीही इंग्लंडला २५० धावांचा टप्पा गाठता आला नाही. त्यानंतर भारताच्या संघाने २४९ धावांचे लक्ष्य ३८.४ ओव्हरमध्ये पूर्ण करून संघाने विजय मिळवला.